सौंदर्यमीमांसेची नवीन दृष्टी देणारे ऋषितुल्य समीक्षक !

सौंदर्यमीमांसेची नवीन दृष्टी देणारे ऋषितुल्य समीक्षक !

सौंदर्यमीमांसेची नवीन दृष्टी देणारे ऋषितुल्य समीक्षक !

मराठी साहित्यसमीक्षेत सौंदर्यमीमांसेची नवीन दृष्टी देणारे ऋषितुल्य समीक्षक असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते रा.भा.पाटणकर. आज २४ मे पाटणकरांचा स्मृतिदिन.

राजाराम भालचंद्र पाटणकर हे मुंबई विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. मुंबई विद्यापीठात रूजू होण्यापूर्वी अहमदाबाद, भूज, अमरावती येथील महाविद्यालयात ते इंग्रजीचे अध्यापन करत होते. १९६९ साली ‘इस्थेटिक अॅण्ड लिटटरी क्रिटिसिजम’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले. सौंदर्यशास्त्र हा रा.भा. पाटणकरांच्या व्यासंगी लेखनाचा विषय होता.

रा.भा. पाटणकर म्हणजे सौंदर्यशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र म्हणजेच रा.भा. पाटणकर हे समीकरण १९७४ ला मराठी साहित्यसमीक्षेत प्रचलित झालं, ते आजपावेतो अभंग आहे. १९७४ साली ‘सौंदर्यमीमांसा’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. सौंदर्याशास्त्राचे नवे पैलू याने समोर आणले. सौंदर्यमीमांसेचा सर्वार्थाने वेध घेणारा हा ग्रंथ मराठी समीक्षा व्यवहारात नाममुद्रा आहे.

‘मराठीपुरते बोलायचे तर ‘सुंदर म्हणजे काय?’ या प्रश्नाच्या उत्तराभोवती मर्ढेकरांनी सौंदर्यशास्त्राचा प्रपंच थाटलेला आहे असे दिसून येते. नेमका हाच प्रश्न सोडून अगदी वेगळ्याच दिशेने पाटणकरांच्या विचारांचा प्रवास सुरू झालेला आहे.

कोणत्याही शास्त्रात एखाद्या नव्या दिशेने विचार सुरू झाला म्हणजे पुष्कळ दिवसांचा साचलेपणा एकदम मोडल्यासारखा वाटू लागतो. थोडे मोकळेपणही जाणवते. तसे पाटणकरांच्या या पुस्तकामुळे झाले आहे. ‘नरहर कुरूंदकर यांचा हा अभिप्राय रा.भा. पाटणकरांच्या विचारप्रवर्तक मांडणीचे वेगळेपण दाखवणारा आहे.

स्वायत्त आणि पृथगात्म असणाऱ्या कलाव्यापारावर आधारीत कांट, हेगेल, क्रोंचे यांचे संकल्पनाव्यूह पाटणकर यांनी स्पष्ट केलेत. ‘क्रोंचेच सौंदर्यशास्त्र: एक भाष्य’, ‘कांटची सौंदर्यमीमांसा’ ही पाटणकरांची आणखीही पुस्तके होत. साहित्य समीक्षेत संकल्पना स्पष्टीकरणात रा.भा. पाटणकर यांची समीक्षा दिशादर्शक ठरली. मराठी साहित्यातले आजचे महत्त्वाचे समीक्षक, प्राध्यापक रा.भा. पाटणकर यांचे शिष्यत्व कौतुकाने सांगतात.

News by Vrushali Vinayak


माणूस प्रकाशनचं अजिता साने सोनाले लिखित “पडद्यामागचं गाणं” हे पुस्तक खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!