रेमडिसीवीर रुग्णालयातच उपलब्ध व्हावे ; बीडमधील डाॅक्टरांच्या बैठकीत निर्णय !

रेमडिसीवीर रुग्णालयातच उपलब्ध व्हावे ; बीडमधील डाॅक्टरांच्या बैठकीत निर्णय !

रेमडिसीवीर रुग्णालयातच उपलब्ध व्हावे ; बीडमधील डाॅक्टरांच्या बैठकीत निर्णय !

खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून रेमडेसीवीर आणण्यास पाठवू नये व आपल्या रुग्णालयात रुग्णास लागणारे रेमडेसेवीर इंजेक्शनची आवश्यकता हे स्वतः रुग्णालयामार्फतच करण्यात यावी, असे आदेश बीड शहरात जारी करण्यात आले आहेत.

रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी रेमडिसीवीर इंजेक्शन गरजू रुग्णांना रुग्णालयातच उपलब्ध होईल, असा निर्णय बीड शहरातील सर्व कोविड रुग्णालयांच्या डाॅक्टरांच्या बैठकीत घेण्यात आलाय.

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सदरची बैठक काल घेण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त रा बा डोईफोडे यांनी दिलीय.

बीड शहरातील सर्व खाजगी कोविड- १९ रुग्णालय रेमडीसीवर इंजेक्शन साठीची आवश्यकता इमेलद्वारे कळवतील, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे १ मे पासून बीडमधील आय.टी.आय कोविड सेंटर येथे रेमडेसेवीर इंजेक्शनसाठी रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अर्ज भरण्याची गरज नाही, असं डोईफोडे यांनी म्हटलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!