पाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला कोविडभत्ता !

पाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला कोविडभत्ता !

पाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला कोविडभत्ता !

कोविड संकटकाळातही क्षयरोग नियंत्रणासाठी जीव जोखमीत टाकून रुग्णसेवा देणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दैनंदिन प्रवास व अल्पोआहार भत्ता मंजूर करण्यात आला आहे. म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेच्या पुढाकाराने ५०० कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. ही माहिती वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ व मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संघटना सरचिटणीस सुजाता पुंडे यांनी दिली.

दैनंदिन प्रवास व अल्पोआहार भत्त्यांचा लाभ कोविड काळातील कार्यरत सर्व शासकीय व महापालिका कर्मचाऱ्यांना मिळाला होता. पण क्षयरोग नियंत्रण कर्मचारी मात्र वंचित राहिले गेले होते. याची गांभीर्याने दखल म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेना संघटनेने घेतली.

संघटना अध्यक्ष बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस संजय वाघ , सल्लागार अतुल कुलकर्णी यांनी पत्र व्यवहारातुन विशेष पाठपुरावा केला होता. अखेर काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर महापालिका प्रशासनास हा लाभ मंजूर करणं भाग पडलं आहे .

शहराची आरोग्य व्यवस्था सुरळीत राखण्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भुमिका असते. कोविड काळात खासगी प्रवास व्यवस्थेमुळे कर्मचाऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसलीय. त्यामुळे सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मिळणारा हा विशेष भत्ता कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.

याकामी डॉ. प्राणिता टिपरे (CTO)  यांचंही मोलाचं सहकार्य मिळालं. संघटनेचे मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संघटनेत म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष सागर कदम,अमोल पाटील,भिमराव शिंदे, सरचिटणीस सुजाता पुंडे, महिला अध्यक्ष प्रिया राणे, महेश म्हाब्दी, महेंद्र पानपाटील यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!