दिल ढुंढता है फिर वोही जुने सिनेमे !

दिल ढुंढता है फिर वोही जुने सिनेमे !

दिल ढुंढता है फिर वोही जुने सिनेमे !

खूप वर्षे गाणं ऐकत असतो अन ते अतिशय फेव्हरिट असतं; परंतु त्या गाण्यासंबंधित चित्रपट पाहण्याची संधी कधी आली नाही, असं कधी झालं का तुमच्यासोबत?

दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन
हे गाणं तसं आहे. याची एक खासियत अशी की हे दोन वेगळ्या व्हर्जन मध्ये सुद्धा आहे. एक संथ लयीत आणि एक फास्टट्रॅक. दोन्ही व्हर्जन छान आहेत.

अर्थात,75 मधला हा सिनेमा ! आपला जन्म सुद्धा नव्हता. त्यामुळे पाहण्याचा प्रश्न उपस्थित झाला नाही. परंतु हे गाणं कळायला लागल्यापासून फेव्हरिट झालं. माझं त्रिकूट मित्रमंडळ दर्दी असल्याने एसडी, किशोरपासून येसूदास ते अजीज नाझा अल्ताफ राजा सगळे आपल्यासाठी परिचित झाले. गप्पांच्या मैफिलीत गाण्यात भेटत गेले. पण अशी गाणी अन त्यांचे सिनेमे मात्र बघता आले नाहीत.

मागे वेळ काढून मी मौसम पाहिला.
गुलजार यांचं दिग्दर्शन असणारा हा चित्रपट गुलजार टच नसता तर नवल. चित्रपटाची सुरुवातच पद्मिनी कार घाटातून हिरव्यागार गालिच्यातून धावताना दिसते.

पूर्वी हे गाणं ब्लॅक एन्ड व्हाईटवर पाहत आलो.नंतर कलर अन युट्यूब..परंतु चित्रपट बघावा, असं वाटलं नव्हतं; पण त्यादिवशी अचानक उत्सुकता दाटून आली अन् एवढी वर्षे पारायणं केलेलं गाणं नेमकं काय स्टोरी आहे, हे बघायला उद्युक्त करायला लागलं. तसं गाण्यात काही प्रमाणात सिनेमाची थीम कळायला लागते, तसा अंदाज बांधता येतो. पण चित्रपट पाहिला तेव्हा अंदाजापेक्षा तो वेगळा आणि अनोखा वाटला.

हा चित्रपट मला खूप आवडला. त्यावेळी हा तितकासा चालला नाही म्हणतात. परंतु मला तर बेहद आवडला. युट्यूबवर उपलब्ध आहे. फ्री मध्ये पाहता येईल.

तसं आणखी एक गाणं : कई बार युही देखा है ये जो मन की सीमा रेखा है दिल तोड ने लगता है…आणि रजनीगंधा फुल तुम्हारे महके युही जीवन में ही गाणी देखील भलतीच आवडत होती.. तो चित्रपट सुद्धा अलिकडे पाहून घेतला. लॉकडाऊनने या काही गोष्टी साध्य झाल्या..!


मिलिंद धुमाळे

पत्रकार, अभ्यासक, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ता

visit milind’s FB page/

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!