मैं मुस्कुराहट हुं…मैं जगदीप हुं !

मैं मुस्कुराहट हुं…मैं जगदीप हुं !

मैं मुस्कुराहट हुं…मैं जगदीप हुं !

या तो दीवाना हंसे,
या वो, जिसे तौफीक दे ,
वरना इस दुनिया में आकर,
मुस्कुराता कौन है। “…

मैं मुस्कुराहट हूंँ , जगदीप हूंँ , आओ हंसते हंसते और जाओ हंसते हंसते …हे त्याचे अखेरचे शब्द. समाजमाध्यमातून एका व्हिडीओद्वारे जावेदने प्रसारित केलेले. हसता हसता जगावं आणि मरता मरता हसावं, हा आयुष्याचा आनंदी मशवरा देऊन अलविदा झालाय जगदीप. जाँनी वॉकर, केस्टो मुखर्जी , मेहमूद ,राजेंद्रनाथ यासारख्या हुकमी काँमेडियन्सच्या गर्दीत शिरुन स्वतःची ओळख बनवणारा जगदीप, शोलेमधला सुरमा भोपाली, म्हणजेच सय्यद ईश्तिय अहमद जाफरी.

जगदीप गेल्याचं कळलं. आणि त्याचं उचक्या देऊन बोलणं, अभिनयी मोठ्ठाले डोळे, काँमेडीतलं अचूक टायमिंग साधणारा खेळकर व निरागस काँमेडियन सुरमा भोपाली डोळ्यासमोर घिरट्या घालू लागला.

विविधांगी विनोदी भुमिकांतून हसवणाऱ्या या काँमेडियनच्या आयुष्याची सुरुवात डोळे ओलावणारी. तितकीच त्याची जिंदादिली उर्जा देणारीही.

खरंतर,तेव्हाचे (सेंट्रल प्रोविन्स) मध्य प्रदेशातील दतियात एका बँरिस्टरच्या घरी २९ मार्च १९३९ रोजी जन्मलेला मुलगा तो. १९४७ साली सरकारनं कागदावर एक रेघ ओढली. आणि देशाचे तूकडे केले. याच वर्षी जगदिपचे वडील गेले. सारं कुटुंब रस्त्यावर आलं.

आईनं लेकरांसह मुंबई गाठली. एका अनाथाश्रमात स्वयंपाकीणीचं काम केलं. तेव्हा जगदीप आठच वर्षाचा होता. त्याने शाळा सोडली. आणि, रस्त्यावर साबणं , कंगवे, पतंग विकले. दिवसाला एकदीड रुपया कमवून घर सांभाळलं. कारण तेव्हा त्याला फक्त जगायचं होतंं. कोणतंही वाईट काम न करता.

पुढे, बी आर चोपडा यांच्या ‘अफसाना’ चित्रपटातील टाळ्या वाजवणाऱ्या मास्टर मुन्नाच्या, ‘व लैलामजनूमधील बालभूमिकेतून ३/- रुपयांवर काम करण्याची त्याला संधी मिळाली. तीन रूपयांच्या लालसेने रुपेरी पडद्यावर आलेल्या या काँमेडियनच्या निखळ विनोदी भूमिकांवर रसिकांनी सात दशकं मनमुराद टाळ्या वाजवल्या. विमल राँय यांच्या ‘दो बिघा जमीन ने जगदीपला खऱ्या अर्थानं विनोदी अभिनेता म्हणून ओळख दिली.

सन १९५७ मधील पी ए संतोषी दिग्दर्शित ‘ हम पंछी एक डालके ‘ या चित्रपटातील तरुण जगदीपच्या अभिनयाची तारिफ तर खुद्द पंडीत जवाहरलाल नेहरू यांनीही केली होती.

यादरम्यान अनेक चित्रपटातनं झळकलेला हा विनोदी चेहरा १९७५ सालच्या ‘ शोले ‘मधिल वखारवाला सुरमा भोपालीच्या भुमिकेमुळे प्रेक्षकांच्या काळजात घुसला, तो कायमचाच. २०१२ मधील ‘गली गली चोर’ मध्ये पोलिसाच्या भुमिकेत तो अखेरचाच दिसला. जगााला ४०० पेेक्षा अधिक चित्रपटातून जगदीपने आपल्याला खळखळून हसवलं.

जगदीपच्या जाण्यानं एका निरागस सहजगम्य काँमेडी पर्वाचा अंत झालाय. जगदीपचा देह खाक- ए- सुपुर्द झालाय खरा पण सुरमा भोपालीचा हसरा चेहरा कधीच काळाच्या पडद्याआड जाऊ शकत नाही.

 

प्रफुल केदारे

लेखक पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!