बदल्यांच्या स्पर्धेतील विजेते !

बदल्यांच्या स्पर्धेतील विजेते !

बदल्यांच्या स्पर्धेतील विजेते !

राज्यात सरकार कोणाचेही येवो. सरकार कुणाचंही असो. काँग्रेसचं असो. सेना-भाजप युतीचं असो किंवा महाविकास आघाडीचं असो. हे सरकार कोणाचही असलं, तरी या सरकारांचेही कुणी मालक असतात व ते मालक त्यांना, स्वतःला हवे तसे निर्णय घेण्यास सरकारातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना भाग पाडतात…

तुम्हाला आश्चर्य वाटलं ना ? मी असं विधान केलं म्हणून ? पण मित्रांनो, शासनाच्या प्रशासन यंत्रणेत असे काही अधिकारी आहेत, की जे स्वतः मालक असल्याचंच दिसून येतं. अशा मालक असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकीच एक अधिकारी म्हणजे, सुदर्शन तोडणकर हे सहाय्यक नगररचनाकार या पदावर स्वतःच्या मर्जीनुसार काम करणारे अधिकारी !!

सुदर्शन तोडणकरांवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांचं इतकं प्रेम की, नोकरीतील दहा-बारा वर्षांहूनही अधिक काळ ते, बदलापूर नगरपालिकेतच नोकरी करत आहेत. त्यांची बदली होते. पण ते बदलीच्या ठिकाणी हजरचं होत नाहीत. मग मंत्रालयातले त्यांचे पाठीराखे अधिकारी त्यांची पुन्हा बदलापूर नगरपालिकेतच बदली करतात !!

बरं तोडणकर म्हणजे एकदम भारी माणूस ! इतका की त्यांच्या बदलीच्या शिफारशी करण्यात राज्यातील आमदार, खासदार,मंत्री अगदी दिल्लीतील राजकीय पक्षांचे पदाधिकारीही मागे नाहीत. आता एवढा कामाचा अधिकारी असल्याने,अशा अधिकाऱ्याला बदलापुरात आणण्यासाठी बदलापुरातील राजकीय नेते मंडळीही पुढेच असणार !! या साऱ्यांच्या प्रयत्नाने सुदर्शन तोडणकर यांची बदलापूर पालिकेत सहाय्यक नगर रचनाकार या पदावर पुन्हा एकदा स्थापना झाली.

तोडणकर यांच्या कामसूपणाचं एक उदाहरण खूप चर्चेत होतं. बदलापूर पालिकेत कार्यभार नसतानाही, तोडणकर यांनी बदलापूर पालिकेच्या नगररचना विभागात सुमारे नऊ महिने कारभार हाकला होता असं म्हणतातच की ! सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती आहे.

” मंत्रालयात बदल्यांचा बाजार” अशा शीर्षकाची, लेख वजा बातमी मी कुठेतरी वाचली. मला ती बातमी शंभर टक्के पटली. बदल्या करून देणं आणि करून घेणं हा एक प्रतिष्ठित धंदा झाला आहे. ” प्रशासकीय कारणास्तव” अशा कारणाखाली असे प्रकार सर्रास केले जातात. ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, ते अधिकारी त्यांना हव्या असणाऱ्या ठिकाणीच, स्वतःची बदली करून घेतात. तशी बदली करणारे, मंत्रालयातील निलाजरे अधिकारी, बिनदिक्कतपणे, सारी नीतिमत्ता गुंडाळून अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात.हे प्रकार कसे होतात ही आता लपून राहिलेली गोष्ट नाही.

आता एवढे सारे उपद्व्याप करून, बदली करून घेणारा अधिकारी, बदलीच्या ठिकाणी “संताच्या” भूमिकेत काम करेल का? तशी अपेक्षाही ठेवणं हास्यास्पदचं नव्हे तर मूर्खपणाच नव्हे का ? आजच्या भ्रष्टाचारी सभोवतालात या भ्रष्ट यंत्रणेला, सत्तेला न जुमानणारे अधिकारी आहेत, जे त्यांना हवा असलेला , हवा तसा निर्णय घेण्यास , प्रशासनातील तसल्याच अधिकाऱ्यांना भाग पाडतात. ही अशीच मंडळी आज ” विजेत्याच्या ” भूमिकेत असतात ! हे दुर्दैव असलं तरी सत्य आहे.

 

विनायक जाधव

ज्येष्ठ पत्रकार, व्यंगचित्रकार, सामाजिक-राजकीय अभ्यासक

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!