शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या गुन्ह्यात मंत्रीपुत्र आशिष मिश्राला अखेर अटक !

शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या गुन्ह्यात मंत्रीपुत्र आशिष मिश्राला अखेर अटक !

शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या गुन्ह्यात मंत्रीपुत्र आशिष मिश्राला अखेर अटक !

लखिमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या घटनेतला मुख्य आरोपी आशिष मिश्राला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बारा तासांच्या चौकशीत तपासात असहकार, उडवाउडवीची उत्तरे आणि घटनेवेळी मिश्राच्या उपस्थितीबाबत पोलिसांकडे असलेले पुरावे मिश्राच्या अटकेला कारणीभूत ठरले.

लखिमपुर खेरीतील घटना देशभरात मोठ्या चर्चेचा विषय ठरली. या घटनेने भारतीय जनता पार्टीचे राजकारण यूपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संकटात आणले. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी भारतीय जनता पार्टीची अवस्था झाली होती.

सुरुवातीला ही घटना हिंसाचाराचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांवरच शेकवण्याचे मुख्यमंत्री अजय मोहन बिष्ट यांच्या सरकारने भरपूर प्रयत्न केले, परंतु मंत्रीपुत्राच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडले गेल्याचे एकापाठोपाठ एक सुस्पष्ट व्हिडीओ समोर येऊ लागल्यानंतर भाजपा आणि यूपी सरकारचाही नाईलाज झाला.

दरम्यानच्या काळात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीकडून निर्माण केलेला दबावसुद्धा प्रभावी ठरला.

इतकी क्रूर घटना घडल्यानंतरही गुन्हा दाखल करायला आणि आरोपीच्या अटकेसाठी तब्बल पाच दिवस घेतल्यामुळे यूपी सरकारची आणि भारतीय जनता पार्टीची मोठी नाचक्की झाली. आशिष मिश्राचे वडील अजय मिश्रा नरेंद्र मोदी यांच्या सरकारात गृहराज्यमंत्री आहेत. त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

मंत्रीपुत्र असल्याने आशिष मिश्राला समन्स पाठवून बोलावण्याची यूपी पोलिसांची कृतीही देशभर टीकेचा विषय झाली. तब्बल बारा तास पोलिसांनी आशिष मिश्रा याची चौकशी केली.

एनडीटीव्ही वाहिनीच्या वृत्तानुसार, अजय मिश्राने चौकशीत पोलिसांना सहकार्य केले नाही. त्याची उत्तरे उडवाउडवीची होती. घटनास्थळापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर एका कुस्ती कार्यक्रमात आपण सहभागी होतो, असा बचाव त्याने करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या मोबाईलचे लोकेशन घटनास्थळाजवळ दिसून येत होते.

घटनेत वापरली गेलेली गाडी आपलीच असल्याचे त्याने मान्य केले. परंतु आपण त्यात नव्हतो, अशीही त्यांने सारवासारव केली.

सुरुवातीला हरी ओम नावाच्या व्यक्तीवर गाडी चालवत असल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु समोर आलेल्या सुस्पष्ट व्हिडिओमध्ये सफेद रंगाचा कुर्ता घातलेली व्यक्ती गाडी चालवताना दिसते, तर हरी ओम ओमने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेला होता. अशा अनेक गोष्टी आशिष मिश्राच्या विरोधात गेल्याने पोलिसांनी अखेर त्याला अटक केली आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!