अत्याचार सहन केले जाणार नाहीत ; नागपूर-पिंपरी घटनांवर गृहमंत्र्यांनी सोडले मौन !

अत्याचार सहन केले जाणार नाहीत ; नागपूर-पिंपरी घटनांवर गृहमंत्र्यांनी सोडले मौन !

अत्याचार सहन केले जाणार नाहीत ; नागपूर-पिंपरी घटनांवर गृहमंत्र्यांनी सोडले मौन !

“राज्यात अनुसूचित जातीच्या बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार कोणत्याही परिस्थितीत अजिबात सहन केले जाणार नाहीत, महाराष्ट्र शासन या बांधवांच्या पाठीशी असून अशा प्रकारच्या गुन्ह्यातील दोषींविरुद्ध तात्काळ व कडक कारवाई करण्यात येईल”, अशी ग्वाही महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.‌

अरविंद बनसोड आणि विराज जगताप यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.सरकारकडून आरोपींना पाठीशी घालण्याच काम होत असल्याची टिका समाज माध्यमांवर उमटू लागली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांना जाब विचारणारे हजारो ट्विट्स राज्यभरातून करण्यात आले होते.

नागपूर घटनेतील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी असून गृहमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे पोलिस राजकीय दबावाखाली प्रकरण दडपू पाहताहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर केला होता.

आता ह्या सगळ्या घटनांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपलं मौन सोडलं आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयाने सदरबाबत माहिती दिली आहे.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!