मनसे नेत्याने कोरोना रुग्ण पळवला ; भरमसाट बिल आकारल्याचा रुग्णालयावर आरोप !

मनसे नेत्याने कोरोना रुग्ण पळवला ; भरमसाट बिल आकारल्याचा रुग्णालयावर आरोप !

मनसे नेत्याने कोरोना रुग्ण पळवला ; भरमसाट बिल आकारल्याचा रुग्णालयावर आरोप !

मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने कोरोनाच्या रुग्णाला उपचार झाल्यानंतर बिल न भरता रुग्णालयातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंबंधित संबंधित हिंंदुुसभा रुग्णालयाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दाखल तक्रारी नुसार,

संबंधित कोरोनाबाधित रुग्ण २१ मे रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याची प्रकृती खालावत असल्यामुळे त्याला २५ मे रोजी आय सी यू मध्ये दाखल केले.हा रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्णालयाने राज्य सरकार व महापालिकेच्या नियमांचे पालन करुन रुग्णालयांना ठरविण्यात आलेल्या दराप्रमाणेच बिल आकरण्यात आले. रुग्णाला बिलामध्ये ट्रस्टींसोबत बोलून, सवलतीचे आश्वासनही वैद्यकीय संचालकांनी दिले होते.

मात्र, तरीदेखील मनसे नेता गणेश चुक्कल याने आपल्या सहकाऱ्यांसोबत संबंधित रुग्णाला डॉक्टरांचा सल्ला न घेता आणि थकित बिल न अदा करता जबरदस्ती रुग्णालयातून पळवून नेले असा आरोप रुग्णालयाने केला आहे.

संबंधित रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्या रुग्णांस १४ दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक असल्याचेही रुग्णालयाने तक्रारीत म्हटले आहे.

गणेश चुक्कलच्या म्हणण्यानुसार,

संबंधित रुग्ण बरा झाल्यानंतरही केवळ बिल वाढविण्यासाठी रुग्णालय बळजबरी रुग्णास अडवून ठेवत असून  जवळपास ३ लाख ८० हजारांहून अधिक बिल झाले होते. हे बिल भरण्या साठी रुग्णालयातील डॉक्टर वारंवार रुग्णाच्या नातेवाईकांना फोन करत होते. मात्र बिल भरण्यास रुग्णाचे नातेवाईकांची हतबलता होती.

महापालिकेने आरोग्यदायी योजनेअंतर्गत उपचार करा असे निर्देश दिले असतांंना देखील जास्त बिल आकारण्यात आले होते आणि आता रुग्णालय बिल सवलतीबाबत सपशेलखोटं बोलत असल्याचा आरोप चुक्कल यांने केला  आहे.

News by Praful Kedare

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!