आधुनिक यंत्रणा वापरूनही निवडणूक आकडेवारीचा घोळ सरेना !!!

आधुनिक यंत्रणा वापरूनही निवडणूक आकडेवारीचा घोळ सरेना !!!

आधुनिक यंत्रणा वापरूनही निवडणूक आकडेवारीचा घोळ सरेना !!!

निवडणूक बॅलेटपेपरवरून ईव्हीएम मशिनवर आलीय. एका बटनात नेमकी आकडेवारी देणारी ही यंत्रणा आहे. पण निवडणूक आयोगाला सहा महिने उलटले तरी अजून लोकसभेची नेमकी आकडेवारी सांगता आलेली नाही. आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या बदलत्या टक्केवारीचा खेळ पुन्हा सुरू झालाय.

मताधिकारादिवशी ५६.६५ टक्के इतकी आकडेवारी दाखवणाऱ्या आयोगाच्या वेबसाइटवर थेट चार टक्क्याने वाढ होऊन आता ६०.४१ टक्के इतका मताधिकार दाखवण्यात येत आहे. विशेष म्हणजे आयोगाकडूनच आकडेवारी घेणाऱ्या माध्यमांतसुध्दा एकवाक्यता नसून काही माध्यमांनी ६३ टक्के मतदारांनी मताधिकार बजावल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने आकडेवारी सोबत डिस्क्लेमर प्रदर्शित करून नेमक्या आकडेवारीची जबाबदारी झटकली आहे. ही गंभीर गोष्ट आहे.

ज्यावेळी बॅलेटपेपरवर निवडणूक प्रक्रिया राबवली जात होती, त्यावेळीही मताधिकार दिनीच संध्याकाळी जी टक्केवारी निवडणूक आयोग घोषित करीत असे तिच्यात व अंतिम टक्केवारीत फारसा फरक पडत नसे, पण आता ईव्हीएमसारख्या आधुनिक यंत्रणेच्या वापरानंतर आश्चर्यकारकरीत्या आकडेवारीचा घोळ वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत तर उमेदवारांना मिळालेली एकूण मते व मताधिकार बजावलेल्यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचं अनेक मतदारसंघात दिसून आलं आहे. आयोगाला ना त्यावर समाधानकारक उत्तर देता आलंय, ना आकडेवारीतील घोळ निस्तारता आलाय.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेसाठी मतमोजणी २४ आॅक्टोबरला होतेय. तोवर मताधिकाराच्या टक्केवारीत आणखी फरक पडेल काय, बजावलेली एकूण मतसंख्या आणि मतमोजणीपूर्वीची घोषित मतसंख्या जुळणारी असेल की त्यात तफावत असेल, हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!