एसी लोकल उशीर का करतात ? मध्य रेल्वेने सांगितलं कारण…

एसी लोकल उशीर का करतात ? मध्य रेल्वेने सांगितलं कारण…

एसी लोकल उशीर का करतात ? मध्य रेल्वेने सांगितलं कारण…

कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर आणि कावालो उल्हासनगर नागरी सुविधा कक्षाचे अध्यक्ष शैलेंद्र रुपेकर यांना जायचं होतं मुंबईत मंत्रालयात. १२ वाजून ४० मिनिटांनी उल्हासनगरहून सुटणारी अंबरनाथ-सीएसएमटी एसी लोकल पकडण्याचं त्यांचं नियोजन होतं.‌ पण ती लोकल अंबरनाथहूनच निघाली १ वाजून ३५ मिनिटांनी. तब्बल ५५ मिनिटे उशीरा !

रेल्वे या विलंबाची लाख कारणं सांगेल, पण राज असरोंडकरांचा मुलगा निनाद याने आपल्या वडिलांना घरातून निघतानाच सांगितलं होतं की आरामात निघा. एसी लोकल कधीच वेळेवर नसते. खबरदारी म्हणून राज असरोंडकर धावपळ करीत १२.४० च्या आधीच उल्हासनगर स्टेशनवर पोचले. लोकल गेली नाही ना, असं त्यांनी वाट पाहत असलेल्या शैलेंद्रला विचारलं, तर त्याने सांगितलं, गाडी लेट आहे. अनाऊन्समेंट झालीय.

त्यानंतर घोषणा केली गेली की एसी लोकल अंबरनाथ स्टेशनला काही कारणांसाठी थांबवण्यात आली आहे. थोड्या वेळाने सुटेल !

काही वेळानंतर सांगण्यात आलं की अंबरनाथ स्टेशनातून गाडी १ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. तोवर राज असरोंडकर यांचा मुलगा वडिलांना म्हणाला, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, घाई करू नका. हे नवीन नाहीये. रोजचं आहे.

रेल्वे मात्र कारणांची जंत्री घेऊन तयार आहे. राज असरोंडकर यांनी केलेल्या ट्वीटवर रेल्वेने थातुरमातुर कारणं सांगितली आहेत.

नियमित लोकलचं उल्हासनगर - सीएसएमटी प्रवासाचं तिकीट २० रुपये आहे आणि एसी लोकलचं तिकीट ११५ रुपये. सहापट जास्त ! पण सेवा काय देताय आपण ? असा प्रश्न असरोंडकर यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय क्षेत्र व्यवस्थापकांना विचारला. त्यांनी वरिष्ठ विभागीय संचालन व्यवस्थापकांना विचारणा केल्यावर तिकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की गाड्या वेळेवर धावाव्यात, पण अनपेक्षित समस्या येतात, जशा की चेन खेचणं, अतिक्रमण किंवा आगळीक करणारे घटक, लेव्हल क्राॅसिंगवर वाहतूक कोंडीमुळे उघडी असलेली फाटक, उशीरा धावणाऱ्या इतर गाड्या इत्यादी कारणांमुळे गाड्यांना उशीर होतो.

राज असरोंडकर यांना रेल्वेने दिलेलं कारण पटलेलं नाही, कारण त्यात काहीही ठोस नव्हतं. शिवाय, त्यांच्या मुलाने आधीच सांगितलं होतं की गाडी उशीराच येते, म्हणजे उशीराची रेल्वेला सवय झालीय आणि तो प्रवाश्यांच्या अंगवळणी पडलाय.

सगळ्यात संतापदायक बाब अशी की मुंबईहून परतताना असरोंडकर यांचं सीएसएमटीहून रात्री ८ वाजताची कल्याण एसी लोकल पकडण्याचं नियोजन होतं. स्टेशनवर आल्यावर घोषणा ऐकायला मिळाली की गाडी १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे. एसीचं तिकीट असतानाही असरोंडकर व त्यांच्या सहकाऱ्यांना नाईलाजाने आसनगाव जलदने प्रवास करावा लागला.

याबाबतही असरोंडकर यांनी रेल्वेला ट्वीट केलंय. दुपारच्या विलंबासाठी तर बहाणेबाजी केलीत, आता काय कारणं सांगाल ? असं त्यांनी विचारलं. त्यावर रेल्वेकडून आपली तक्रार चौकशीसाठी पुढे पाठवण्यात आलीय, असं उत्तर दिलंय. 

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!