कोविड प्रतिबंधासाठी असरोंडी गावानेच उभारलं स्वतःचं पथक !

कोविड प्रतिबंधासाठी असरोंडी गावानेच उभारलं स्वतःचं पथक !

कोविड प्रतिबंधासाठी असरोंडी गावानेच उभारलं स्वतःचं पथक !

कोविड संसर्गाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक घातक असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता ग्रामीण भागातही सतर्कता वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील असरोंडी गावात ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेच्या जोडीला स्वत:चंही एक पथक बनवून कोविडचा मुकाबला सुरू केलाय. हे पथक गावभर फिरून संशयित रुग्णांचा शोध घेतं तसंच ग्रामस्थांचं कोविड प्रतिबंधक उपायांसाठी प्रबोधनही करतं.

मुंबई, पुणे व अन्य ठिकाणांहून येणाऱ्यांसाठी असरोंडी गावात १४ दिवसांचं विलगीकरण बंधनकारक करण्यात आलं आहे, अशी माहिती सरपंच स्नेहा सावंत यांनी मिडिया भारत न्यूज ला दिली.

उन्हाळ्याच्या दिवसात चाकरमान्यांचा गावाकडे ओढा असतो. आंबे, फणसाचे, काजूचे हे दिवस असल्याने लोक सुट्टी घालवायला गावी जाणंच पसंत करतात.

सद्या कोविड संकटातही गावी येणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे संक्रमणाची भीती लक्षात घेता, गावात येणाऱ्या प्रत्येकाची ग्रामपंचायतीत नोंद आणि हिवाळे आरोग्य केंद्रावर आरोग्य तपासणी तसंच विलगीकरण बंधनकारक करण्यात आलं आहे, असं स्नेहा सावंत यांनी सांगितलं. शासन निर्देशांचं पालन आणि ग्रामस्थांचा सहभाग यातून आजवर आम्ही कोविड मुकाबल्यात सफल झाल्याचं सावंत यांनी सांगितलं.

असरोंडी गावात कोविडपूर्व आरटीपीआर किंवा ॲन्टिजेनसारख्या वैद्यकीय चाचण्यांची सोय नसल्याने जोवर संसर्गाची लक्षणं दृश्य स्वरूपात येत नाहीत, तोवर उपचारांची धावपळ होत नाही. गावात दोन कोविडमृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण त्यापलिकडे सद्यातरी अजून कोणात लक्षणं आढळलेली नाहीत. मात्र, ग्रामपंचायतीत कोविड मृत्यूंची एकही नोंद नाही, असं सरपंचांनी सांगितलं.

दीड हजार लोकसंख्येचं गाव आहे. आरोग्यविभागाच्या उपाययोजनांसोबत पूर्व खबरदारीसाठी गावातीलच नागरिकांनी एकत्र येऊन पथक बनवलंय. अशी माहिती ज्ञानेश्वर किर्लोस्कर यांनी दिली. कोविडचा मुकाबला गाव एकजूटीने करतंय, असं किर्लोस्कर म्हणाले.

हे पथक आरोग्यविषयक जनजागृतीचे काम करत आहे. लोकांना मास्क आणि सॅनिटाईझर्सचं वितरण व्हावं, यासाठीही पथक धडपडतं आहे. थर्मल स्कॅनर तसंच ऑक्सिमीटर्सची गावाला गरज आहे. या कामी कोणास सहकार्य / सहाय्य / आर्थिक योगदान करायचं असल्यास ज्ञानेश्वर किर्लोस्कर (+91 94230 75348 ) यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!