भारताने खरंच एक कोटी कोरोनारुग्ण बरे केलेत ?

भारताने खरंच एक कोटी कोरोनारुग्ण बरे केलेत ?

भारताने खरंच एक कोटी कोरोनारुग्ण बरे केलेत ?

भारताने एक करोडहून अधिक कोरोना रुग्ण बरे केले, असा दावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल्यावरून सोशल नेटवर्किंगमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली गेली. भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या दोन लाख नाही. जगातली संख्या ६५ लाखांच्या आसपास आहे. मग मोदींनी एक करोड आकडा आणला कुठून, यावरून त्यांची भरपूर टिंगल केली जात आहे. फेकूगिरी चा आरोप मोदींवर केला जात आहे. पण खरंच मोदींनी एक करोड कोरोना रुग्ण बरे केल्याचा दावा केला आहे का ?

मोदींना कोंडीत पकडण्याची संधी लोकांना मिळाली ती इंडियाटीव्ही च्या बातमीमुळे ! मन की बात मध्ये मोदी काय बोलले, याचं वृत्तांकन करताना इंडिया टीव्हीच्या रिपोर्टर्सनी मोदींवरच्या प्रेमापोटी आकडा फुगवल्याचं दिसतं. त्याचाच स्क्रीनशाॅट घेऊन लोकांनी मोदींना लक्ष्य केलं.

इंडिया टीव्ही आता म्हणतोय की ही मानवीय चूक आहे. ३० मे रोजीच्या मन की बात मध्ये मोदींनी कोरोनाचे एक करोड रुग्ण बरे केल्याचा कोणताही दावा केलेला नव्हता.

मोदी बोलले होते, आयुष्मान योजनेबद्दल ! त्या योजनेचा लाभ एक करोडहून अधिक रुग्णांना मिळाला, असं मोदी म्हणाले होते.‌ तो आकडा कोरोना रुग्णांचा दाखवून इंडिया टीव्ही ने बातमी चालवली. पण ती खोटी होती.

इंडिया टीव्ही ने खुलासा करून त्याबद्दल माफी मागितली आहे.

वास्तविक, इंडिया टीव्हीचा स्क्रीनशाॅट फिरवून केलेला दावा लोकांना #मनकीबात चा एपिसोड ऐकूनही तपासता आला असता. पण तितका वेळ मोदींच्या समर्थकांकडेही नाही; तर विरोधक कशाला काढतील ?

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!