कोंबड्यांना बाधित करणारा तो विषाणू अस्तित्वातच नाही !

कोंबड्यांना बाधित करणारा तो विषाणू अस्तित्वातच नाही !

कोंबड्यांना बाधित करणारा तो विषाणू अस्तित्वातच नाही !

एका वृत्तवाहिनीद्वारे एक बातमी प्रकाशित झाली त्यानंतर कुक्कुटपालन करणाऱ्या शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण पसरलं.

येणा-या काळात कुक्कुटपालन व्यवसायाला हानी पोहचवणारा करोना पेक्षा भयंकर असा ॲपोकॅलिप्टीक व्हायरस येण्याची शक्यता आहे अशी ती बातमी सगळीकडे फिरु लागली. ह्या बातमीला आधार म्हणून अमेरिकेतील आहार तज्ञ मायकल ग्रेगर यांच्या पुस्तकाचा हवाला जोडण्यात आला.

पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी हा दावा पूर्णतः खोडला असून
ॲपोकॅलिप्टीक नावाचा कोणताही व्हायरस अस्तित्वातच नाही अस त्यांनी सांगितल आहे.

ॲपोकॅलिप्टीक या शब्दाचा अर्थ ‘जगाचा विनाश करणारा’ असा होतो मायकल ग्रेगर यांनी विनाश या अर्थानी तो शब्द आपल्या अहवालात वापरला आहे त्याचा कुक्कुटपालनाशी काहीही सबंध नसल्याच अनुप कुमार यांनी सांगितल आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पशुंमधील रोगांचे निरिक्षण करणाऱ्या ओआयई संस्थेने नमुद केलेल्या कोबड्यांना बाधित करणाऱ्या विषाणूंमध्ये ह्या नावाचा कोणताही विषाणू समाविष्ट करण्यात आलेला नसल्याचे अनुप कुमार यांनी म्हटले आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!