अयोध्येत रामाच्या मूर्तीचा फोटो टिपताना फोटोग्राफर रडला ?

अयोध्येत रामाच्या मूर्तीचा फोटो टिपताना फोटोग्राफर रडला ?

अयोध्येत रामाच्या मूर्तीचा फोटो टिपताना फोटोग्राफर रडला ?

विषय कोणताही असो, कितीही मोठा असो, डोळ्यासमोर सत्य सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट उभं असो, जगात रिकामटेकड्या फेकूचंदांची कमतरता नाही. या मंडळींना काहीतरी खोटं रेटल्याशिवाय चैन पडत नाही ! त्यांना खोटारडेपणा केल्याशिवाय रोजचा घासही गळ्याखाली उतरत नसेल.

सतत लोकांच्या भावनांना हात घालणं, वेगवेगळ्या कपोलकल्पित कथा रचून, त्या पसरवून लोकांना भावनिक विषयात गुंतवून आणि गुंगवून ठेवणं हा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून चालणारं राजकारण ज्या देशात ऐनभरात आहे, तिथे फेकूचंदांची चांगलीच चलती आहे !

हे सर्वसामान्य नागरिक करतात, त्याचा राजकीय पक्ष किंवा नेत्यांचा काही संबंध नसतो, अशी सारवासारव केली जाते ! परंतु त्यात तथ्य नाही. भारतात या गोष्टी कुठल्या फेकफॅक्टरीत तयार होतात आणि पद्धतशीरपणे पसरवल्या जातात, हे आता जगजाहिर आहे.

एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की सत्य कासवगतीने चालत असतं, तेव्हा असत्य गाव उंडगून आलेलं असतं. अलिकडच्या काळात भारतात असत्य काही सेकंदात देश उंडगून येतं. तुम्ही त्यानंतर फॅटचेकिंग केलं तर त्याला काहीच अर्थ राहत नाही.

बरं तुम्ही आमचंच फॅक्टचेकींग करता, इतरांचं करत नाही, असं उलट ऐकवून या खोटारड्या जमातीला पाठबळ देणारेही इथे कमी नाहीत. तरीसुद्धा सत्य कासवगतीने पसरेल तेव्हा पसरेल, सत्य सांगण्याचा निर्धार सत्यशोधन करणाऱ्यांना सोडता येत नाही.

अयोध्येत एक फोटोग्राफर रामलल्लाचे फोटो टिपताना रडला आणि त्याची ती अवस्था दुसऱ्या फोटोग्राफरने टिपली, म्हणून एक कोलाज पसरवलं जात आहे.

आज भारतात एक धार्मिक वातावरण आहे. लोक राममंदिराच्या घटनेने भारावून गेलेले आहेत. त्यांच्या श्रद्धांवर आरूढ होऊन काही लोक आपलं खोटं रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सत्य वेगळं आहे.

याच फोटोग्राफरचा हाच रडतानाचा फोटो धोनीच्या निवृत्तीवेळीही फेकूचंदांनी पसरवला होता. २०१९ ची 'इंडिया टुडे' ची बातमी आहे. त्यात या फोटोग्राफरचा फोटो आलेला आहे. धोनीचा फोटो काढताना कॅमेरामन खरोखर रडला होता का, अशा स्वरूपाची ती बातमी होती ! बातमीने फोटोतला फोलपणा उघड केला होता.

आता त्याच कॅमेरामनचा फोटो तो अयोध्येतील रामलल्ला चा फोटो काढताना रडला, म्हणून लबाडीने पसरवला जात आहे.

या इराकी क्रीडा छायाचित्रकाराचं नाव मोहंमद अल अझ्झावी ! #एशियनकप२०१९ मध्ये इराक कतारकडून फुटबाॅल मॅच हारला तेव्हा आपला मायदेश हारताना पाहून त्याला अश्रू अनावर झाले होते. मूळ फोटो तेव्हाचा आहे. २४ जानेवारी २०१९ चा हा फोटो आहे.

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!