खरंच मोदी गेले होते का मुकेश अंबानींच्या नातवाला बघायला हाॅस्पिटलात?

खरंच मोदी गेले होते का मुकेश अंबानींच्या नातवाला बघायला हाॅस्पिटलात?

खरंच मोदी गेले होते का मुकेश अंबानींच्या नातवाला बघायला हाॅस्पिटलात?

दिल्लीच्या सीमेवर देशाचा शेतकरी थंडीत कुडकुडत आंदोलन करीत असताना, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नातवाला बघायला मुंबईत हॉस्पिटलात जातात आणि आपल्या पदाची प्रतिष्ठाही धुळीस मिळवतात, असा प्रचार करणारी छायाचित्रे सध्या समाज माध्यमात जोरदारपणे प्रसारित केली जात आहेत.

या छायाचित्रातला खोटेपणा उघड करणारा एक ठळक पुरावा त्या छायाचित्रांमध्येच आहे. छायाचित्रात नरेंद्र मोदी एका हॉस्पिटलात उभे आहेत, हे दिसतं. ते खरंही आहे. त्यांच्यासोबत मुकेश अंबानी आणि नीता अंबानी दिसत आहेत.

त्याशिवाय छायाचित्रात आणखी एक व्यक्ती आहे, सी विद्यासागर राव ! हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते ;

तो काळ होता 2014 चा. छायाचित्रेही त्याच काळातील आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या एच एन रिलायन्स हॉस्पिटल अंड रिसर्च सेंटरच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. सदरची छायाचित्रे त्यावेळची आहेत.

मिडियाभारतन्यूज ने त्याबाबत खातरजमा केली असता सोबतचे छायाचित्र इंडियाटुडे च्या 25 ऑक्टोबर 2014 रोजीच्या वृत्तांकनासोबत सापडतं.

याचा अर्थ स्पष्ट आहे, नरेंद्र मोदींची जी छायाचित्रे मुकेश अंबानीच्या नातवाला बघण्यासाठी गेले होते, म्हणून पसरवली जात आहेत, तो निव्वळ खोडसाळपणा आहे.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!