सत्तरीतील झेलम परांजपेंना ‘संस्कारी’ वांडरांची अर्वाच्य शिवीगाळ…अगदी वधापर्यंतच्या अप्रत्यक्ष धमक्या !

सत्तरीतील झेलम परांजपेंना ‘संस्कारी’ वांडरांची अर्वाच्य शिवीगाळ…अगदी वधापर्यंतच्या अप्रत्यक्ष धमक्या !

सत्तरीतील झेलम परांजपेंना ‘संस्कारी’ वांडरांची अर्वाच्य शिवीगाळ…अगदी वधापर्यंतच्या अप्रत्यक्ष धमक्या !

झेलम परांजपे यांच्या साने गुरुजी आरोग्य केंद्राच्या सांताक्रूझ येथील साने गुरुजी विद्या मंदिरातील विद्यार्थीनींनी सोमवारचा दिवस शाळेत अभ्यासात घालवण्याचा घेतलेला निर्णय रामभक्तांना आवडला नाही. वयाची सत्तरी गाठलेल्या झेलम परांजपेंना सनातनी संस्कृतीचे वारसदार म्हणवणाऱ्या वांडरांनी यथेच्छ शिवीगाळ केली. कर्णाचा वध का आवश्यक असतो, याचं उदाहरण देऊन एकप्रकारे हत्येची अप्रत्यक्ष धमकीही परांजपेंना झेलावी लागली.

महाराष्ट्र सरकारने श्री रामलला प्राणप्रतिष्ठापना दिन म्हणून सोमवारी, २२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे. मात्र, मुंबईतील सांताक्रूझ येथील साने गुरूजी आरोग्य मंदिर संस्थेने शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्याबाबत संस्थेच्या अध्यक्षा झेलम परांजपे यांनी फेसबुकवर पोस्ट केलीय.

आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं...सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राणप्रतिष्ठेची सुट्टी नको. रामलल्ला सुध्दा खूश नाही होणार आमचा अभ्यास बुडला तर.... आमच्या अध्यक्षा झेलमताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार...! अशी ती पोस्ट आहे. पोस्टसोबत शाळेतल्या विद्यार्थिनींचा फोटोही आहे.

या पोस्टखाली हिंदुत्ववाद्यांनी गलिच्छ भाषेत प्रतिक्रिया दिल्यात. सत्तरीतल्या झेलम परांजपे यांना अर्वाच्य शिवीगाळ, अत्यंत आक्षेपार्ह संबोधनं करत त्यांचा नाव, आडनाव, जन्म, आईबापावरून उद्धार करण्यात आलाय. या शिवराळ उन्मादात स्त्रीपुरुष दोघेही सामील झालेले दिसतात. अधर्माची साथ दिल्यामुळे कर्णाचा वध कसा करण्यात आला होता, याचंही उदाहरण प्रतिक्रियांमध्ये देण्यात आलंय. प्रतिक्रियांतली भाषा देशाचा कब्जा कुठल्या खालच्या दर्जाच्या लोकांकडे चाललाय, याची प्रचीती देणारी आहे.

सकारात्मक हे की सदर निर्णयाचा स्वागत करणाऱ्या प्रतिक्रियाही झेलम परांजपे यांच्या पोस्टखाली वाचायला मिळतात. प्राणप्रतिष्ठा अयोध्येत आहे, शिवाय शनिवार-रविवारची लागून सुट्टी येत असल्याने सरकारने घोषित केलेली सोमवारची सुट्टी अनावश्यक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

सामाजिक कार्यकर्ता हेरंब कुलकर्णी यांनीही सुट्टीला विरोध केलाय ; सेवाग्राम येथील आनंद निकेतन तसंच फलटणमधील कमला निंबकर सारख्या शाळांनीही सोमवारी सुट्टी न करण्याचा निर्णय घेतलाय, तर मुंबईतील काही विद्यार्थ्यांनी सोमवारच्या सुट्टीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे.

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!