पुरोगामी महाराष्ट्रात आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांना मोकळेपणाने स्वीकारलं जात नाही !

पुरोगामी महाराष्ट्रात आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांना मोकळेपणाने स्वीकारलं जात नाही !

पुरोगामी महाराष्ट्रात आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांना मोकळेपणाने स्वीकारलं जात नाही !

आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली खंत


 

कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ख्रिश्चन मुलाच्या आंतरधर्मीय लग्नाला आमदार भास्कर यांनी नुसतीच उपस्थिती दर्शवली नाही, तर अशा विवाहांचं समाजमाध्यमांत उघड समर्थनही केलंय. भास्कर जाधवांची ही कृती समाजमाध्यमांत अनेकांचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. कितीही अडचणी, प्रसंग, संकटे आली तरी आयुष्यभर एकमेकांना सांभाळून घेवून सुखी संसार करा, असे शुभाशीर्वाद आपण नवदांम्पत्याला दिल्याचं जाधव यांनी फेसबुक पेजवर लिहिलं आहे.

आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांना मोकळेपणाने स्वीकारले जात नाही, असं नमूद करीत आमदार जाधव यांनी यापूर्वीचीही आठवण सांगितलीय.

'काही महिन्यांपूर्वी माझ्याच मतदारसंघातील खेड खाडीपट्टा भागातील एका मुस्लीम धर्मीय मुलीने हिंदू धर्मीय मुलाशी विवाह केला. त्यानंतर ते दोघे जेव्हा माझे आशीर्वाद घेण्यासाठी आले तेव्हा सर्वधर्मसमभावाचा एक नवीन आदर्श तुम्ही सर्वांपुढे घालून दिला आहात, असे म्हणून मी त्यांचे स्वागत केले होते.' असं जाधव यांनी लिहिलंय.

साहजिकच काही प्रमाणात आपल्यावर टीकाही होते. पण, त्यापेक्षा कितीतरी पटीने समर्थन मिळते, असं प्रतिपादन भास्कर जाधव यांनी केलंय. गेल्या ३६-३७ वर्षात मी कधीही जात-पात, धर्म, पंथ न पाहता सर्वधर्मसमभावाचे राजकारण व समाजकारण केले आणि आजही करीत आहे, अशी भूमिका त्यांनी मांडलीय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!