गायींना कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या हिंदुत्ववादी छुप्या मार्गाचा भांडाफोड !

गायींना कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या हिंदुत्ववादी छुप्या मार्गाचा भांडाफोड !

गायींना कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या हिंदुत्ववादी छुप्या मार्गाचा भांडाफोड !

मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील गोतस्करीअंतर्गत झालेल्या एका गुन्ह्याची चर्चा सध्या देशभरात चांगलीच गाजते आहे ; कारण यातील सर्व आरोपी हे भारतीय जनता पार्टी तसंच बजरंग दलाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पार्टीचे राजकारण मुळातच हिंदुत्ववादी तसंच राम मंदिर आणि गायींची आस्मिता याभोवती फिरत रहाणार आहे. राम मंदिर निर्माण निधीतही काही ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले तसंच राम मंदिर निधी नेमका कोणत्या संघटनेने गोळा करावा, याबाबत संभ्रम असतानाच ही बातमी भारतीय जनता पार्टीसाठी आणखीच डोकेदुखी ठरते आहे. 

मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील लालबर्रा पुलिसांनी तब्बल १३८ गायींची तस्करी करणाऱ्या एका टोळीला गोतस्कर बंदी कायदा २००४ अंतर्गत विविध कलमांखाली अटक केली आहे. ज्या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे, ते सर्वच हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्यामुळे घटनेला अधिक महत्व प्राप्त झालं आहे, तसंच या घटनेने मध्यप्रदेशचे शिवराज सरकार संशयाच्या भोव-यात सापडलं आहे.

आरोपींमध्ये मनोज पारधी (जिला महामंत्री भाजपा युवा मोर्चा), अरविंद पाठक (भाजपा नेता तथा उपसरपंच लालबर्रा), कृष्ण कुमार बिसेन, जयपाल चचने, मनीष टेम्भरे, दिनेश बिसेन, शुभम बिसेन, दिनेश कर्वेटि, पवन पदवार, रविशंकर बनवाले, रमेश हटवार, ऊदल यादव, बबलो इडपाचे, भागचन्द बिसेन, आज़ाद जैसवाल, तोपसिंग जैसवाल, बंटी जैतवारा, मेवा बिसेन, जाहिद आणि अलेश नामक व्यक्तींचा समावेश आहे. सदर गायींना नागपुरच्या दिशेने कत्तलीसाठी घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे.

एरवी, गोमांस, गोतस्करी आणि गोहत्येवरून मुस्लिम समाजाला वारंवार लक्ष्य करणाऱ्या, काही प्रसंगात केवळ संशयावरून संबंधितांची निर्दयीपणे हत्या करणारे तथाकथित गोरक्षक गुंड या घटनेवर चिडीचूप आहेत. भाजपा किंवा कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेने मध्यप्रदेशातील ताज्या घटनेवर आवाज उठवलेला नाही. मध्यप्रदेशातील भाजपा सरकार आणि गोतस्कर आरोपींचे बड्या भाजपा नेत्यांची असलेले निकटचे संबंध पाहता प्रकरण दडपलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मध्यप्रदेशात यापूर्वी संघभाजपा परिवारातील सदस्य भारतीय सैन्याची पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरूनही पकडले गेले आहेत. पण देशद्रोहाचा गंभीर गुन्हा असतानाही भारतातील तथाकथित मोठ्या माध्यमांनी ती प्रकरणं जागच्या जागी दाबून ठेवल्याने जनमानसात त्याविरोधात कधी असंतोष उमटला नाही. आपण भाजपाशी संबंधित असल्याने लोकांच्या नजरेत आपल्याकडे देशभक्तीचं आयतं प्रमाणपत्रं असल्याचा गैरफायदा घेत ही तथाकथित देशभक्त मंडळी देशाविरोधात कारवाया करत असतात.

छत्तीसगडमधील हरीश वर्मा या भाजपा नेत्याच्या गोशाळेत तब्बल दोनशे गायींचा भूकबळी गेल्याचं प्रकरण २०१७ मध्ये उघडकीस आलं होतं. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या माहितीनुसार, भाजपा सरकारच्या कार्यकाळात राजस्थानात ७४ हजार गायींचा मृत्यू झालाय, तर सद्या कडवट हिंदुत्ववादी समजल्या जाणाऱ्या तथाकथित योगी अजय मोहन बिष्ट यांच्या कारकिर्दीत उत्तरप्रदेशातही गायींच्या मृत्यूंचा विषय गाजतोय. अशावेळी मात्र, गायींच्या मृत्यूचं कारण नैसर्गिक असल्याचं सांगून भाजपा नेते हात झटकतात.

मध्यप्रदेशातील बाकोडा गावातून महाराष्ट्राकडे गायींची तस्करीची खबर आल्यावर पोलिसांनी तडक कारवाई करून नशेत धुंद असलेले आरोपी आणि गायींचा ताबा घेतला खरा ; पण तस्करी करणारे भाजपाचेच पदाधिकारी निघाल्याने पोलिसांची आणि सरकारचीही कोंडी झालीय. कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या गायींची संख्या मोठी असल्याने ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि मध्यप्रदेशातील विरोधी पक्षांनी भाजपाला घेरायला सुरुवात केली आहे.

बालाघाट जिल्हा काॅंग्रेसचे प्रवक्ते विशाल बिसेन यांनी मध्यप्रदेशात गोतस्करी करण्यात भाजपाच आघाडीवर असल्याच सांगत आरोपींचे संबंध बालाघाटच्या स्थानिक आमदार गौरीशंकर बिसेन यांच्याशी असल्याचा आरोप केलाय ; त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी ही अगदी पारदर्शी तसंच कसून झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

आरोपी मनोज पारधी यांचे फेसबुक प्रोफाईल चेक केले असता त्याचे भाजपातील असंख्य बड्या नेत्यांशी सलगी असल्याचं दिसून येतंय ; त्यामुळे गायीला केंद्रस्थानी ठेऊन राजकारण करणारा भारतीय जनता पक्ष आरोपींवर काही कारवाई करेल की प्रशासनावर दबाव टाकून आरोपींची सुटका करेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!