पोलिसांची महिलेला बेदम मारहाण आणि प्रकरण दडपण्यासाठी चारित्र्यहननसुद्धा !

पोलिसांची महिलेला बेदम मारहाण आणि प्रकरण दडपण्यासाठी चारित्र्यहननसुद्धा !

पोलिसांची महिलेला बेदम मारहाण आणि प्रकरण दडपण्यासाठी चारित्र्यहननसुद्धा !

एका महिलेला पोलीस ठाण्यात कोंडून चार पोलीसांनी सुंद्रीने जबर मारहाण केली. त्याचे वर्णही तिच्या अंगावर उमटले आहेत. तिचं मेडिकल केलेलं आहे, वगैरे पण कोणीच तिची बाजू घेत नसल्याने तिला मदत करा, अशा आशयाची प्रतिक्रिया एका पोस्टखाली वाचली आणि अस्वस्थ झाले. तिथून सुरू झाला एका महिलेवरील अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा !

काय आहे घटना?

पोलिसांनी महिलेला ठाण्यात मारलंय, ही बाब गंभीर असल्याने तात्काळ संबधित वकीलांना संपर्क करून पिडीत महिलेची माहिती मागवली. महिला रडत होती, मदत करा म्हणत होती. संस्थेकडे तिचा मदतीचा अर्ज मागवून घेतला. बाजू मांडण्याची परवानगी तिच्याकडून लेखी स्वरुपात घेतली. मारहाण झाल्यानंतरचे विडिओ मागवले. दुसऱ्याच दिवशी लातूरचे एसपी पिंगळे यांची भेट घेतली.

तत्पूर्वी नांदेडचे पोलीस कमिशनर निसार तांबोळी यांना फोनवरुन घटनेची माहीती दिली. त्यांना विडीओ पाठवले. त्यांनी एसपींना सांगितलं. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन संबधित महिलेकडुन माहिती विचारून घेतली आणि लागलीच अहमदपूरचे पोलीस उप अधिक्षक बलराज लांजीले यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी दिली.

काय घडलं त्या दिवशी पोलिस ठाण्यात?

१५ फेब्रुवारीला पीडित महिला तिच्या नवऱ्याला घेऊन ठाण्यात गेली होती. महिलेच्या पुतण्याने मोटरसायकलला कट मारल्याने ते दोघे नवरा बायको पडले होते. पण ही महिला लोकांच्या विरोधात सारख्या तक्रारी करायला का येते, म्हणून तिला आणि तिच्या नवऱ्याला सीसीटीव्ही कँमेरा नसलेल्या रुममध्ये नेऊन सुंद्रीने जबर मारहाण केली.

यात तिच्या नवऱ्याला पोलिसांनी पायातील बुटांनी मारलं. महिलेला लेडीज काँन्सटेबलच्या मदत घेऊन सुंद्रीने मारलं. लेडी पोलीस हात पुढे करामला सांगत आणि मग इतर पोलीसं तिला मारत, अशी महिलेची तक्रार आहे.

दुपारी बारा वाजता पोलिस ठाण्यात गेलेले नवरा बायको अन्नपाण्याविना होते. रात्री आठच्या नंतर ना तक्रार ना मेडिकल पत्र अशा अवस्थेत त्यांना धमकावत घरी पाठवण्यात आलं. यात वीज करंटच देण्याची, अंगावर,पेट्रोल टाकायची धमकीही मारहाणीदरम्यान देण्यात आली, असं महिलेने पत्रकारांनाही सांगितलं. पोलीसांकडून मारहाण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिला दवाखान्यात अँडमिट झाली होती. तसे पुरावे संबधीत दवाखान्यात आहेत (एमएलसी)

प्रकरणाचं मूळ जमीनीच्या वादात ?

पीडितेच्या सासऱ्याने मुलांमध्ये जमीन वाटप केल्यानंतर पीडितेच्या नवऱ्याच्या वाट्याला १५ एकर जमीन आलीय. पण भावाच्या भोळसटपणाचा गैरफायदा घेऊन भावांनी त्या जमीनीवर कब्जा केलाय. सगळ्या वादाचं मूळ इथे आहे. कुटुंबातीलच सदस्य तिच्यासोबत नाहीत. उलट, तिचं चारित्र्यहनन करतात. गावातल्या दोघांनी तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. पण पाठबळ नसल्याने महिला तक्रार करू शकली नव्हती.

पोलिसांत नव्याने केलेल्या अर्जात तिने त्या घटनेचा उल्लेख केलाय. पण या घटनेचाही तिच्या चारित्र्यहननासाठी वापर केला जातोय. कोणाचंही नाव घेऊन ती 'ठेवलेली' असल्याचंही गावात बोंब उठवण्यात आलीय. ही बदनामी इतकी पसरलीय की पीडितेच्या माहेरचे लोकही तिच्या विरोधात गेलेत. ती जवळपास बहिष्कृत आहे.

चारित्र्यहननामुळे पीडिता एकाकी आणि असुरक्षित 

पण काही जरी असलं तरी १५ एकर जमीनीवरचा तिच्या नवऱ्याचा हक्क कायदेशीर आहे. त्याचा दस्तावेज आहे. पण ती जमीन तिला कसू दिली जात नाही. शेतात गडी आले तरी त्यांना हाकलून दिलं जातं. अर्थात भावकीतूनच पाठबळ नसल्याने उलट विरोधच असल्याने पीडितेला गावात कोणी वाली नाही.

किनगाव पोलिस ठाण्यातीलसहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड म्हणतात, ती सारखी तक्रारी घेऊन पोलिस ठाण्यात येत असते. आता तर जिल्हाधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा अस़ तिचं म्हणणं आहे. अर्थात, पोलिस ठाण्यात तिला मारहाण झाल्याचा बंकवाड यांनी इ्न्कार केलाय. असं असली तरी समाजमाध्यमात प्रकरण चर्चेत आल्याने पोलिस अधिक्षकांनी चौकशी सुरू केलीय. पीडितेने जबाब मागे घ्यावा म्हणून गावातून तिच्यावर दबाव असल्याचं कळतं. अन्यथा गाव सोडून जायलाही तिला मजबूर केलं जाऊ शकतंया चौकशीदरम्यान आता पीडितेच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 

 

 

सत्यभामा सौंदरमल

दारुबंदी आणि कौटुंबिक हिंसाचारविरोधी सामाजिक कार्यकर्ता 

सचिव, निर्धार सामाजिक संस्था

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!