वाढीव विजबिलांचा ‘ हिसाब दो ‘ ! ‘आप’ ची राज्यस्तरीय मोहिम !!

वाढीव विजबिलांचा ‘ हिसाब दो ‘ ! ‘आप’ ची राज्यस्तरीय मोहिम !!

वाढीव विजबिलांचा ‘ हिसाब दो ‘ ! ‘आप’ ची राज्यस्तरीय मोहिम !!

आम आदमी पार्टीने वीज दरवाढीच्या विरोधात राज्यभरात ‘हिसाब दो’ मोहीम लाँच केली आहे. hisaabdo.in या वेबसाईटच्या माध्यमातून वीज नियामक मंडळाला वाढीव विजबिलांबाबत आता नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार आहे. तसेच या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना दिल्ली व महाराष्ट्राच्या विजबिलांमधील तफावत देखील समजून येणार आहे.

या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. रंगा राचुरे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे.

आपच्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा : हिसाब दो

आधीच लॉकडाउनमुळे होरपळलेल्या सामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा शॉक राज्य सरकारने दिलेला आहे. या विरोधात आपली मोहीम तीव्र करत नागरिकांना या दरवाढी विरोधात संघटित करून राज्य सरकार तसेच वीज नियामक मंडळापर्यंत त्यांच्या तक्रारी पोहचवण्यासाठी ‘आप’ ने ही मोहीम उघडली आहे.

वीज दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची झालेली आहे हे माहीत असताना देखील दरवाढ लागू करणे म्हणजे सामान्यांचं शोषण करणारं आहे. लॉकडाउन काळातील ४ महिन्यांचं प्रति महिना २०० युनिट वीज बिल माफ करावं, यासाठी आम आदमी पार्टीने राज्य सरकारकडे मागणी केली असल्याची माहिती राचुरे यांनी दिली.

या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून हिसाब दो ही वेबसाईट लाँच करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अन्यायी वीज दरवाढीविरोधात अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलंय. जोपर्यंत वीज दरवाढ मागे घेतली जात नाही व २०० युनिट बिल माफ केले जात नाही, तोपर्यंत ‘आप’ चे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही राचुरे यांनी दिला आहे.

“दिल्ली सरकारने राज्याच्या वीज वितरण प्रणालीमध्ये क्रांतिकारक सुधार करून नागरिकांना प्रति महिना २०० युनिट वीज मोफत दिली. जे दिल्लीत होऊ शकते ते महाराष्ट्रात का नाही? असा सवाल पक्षाचे सह-संयोजक श्री. किशोर मंध्यान यांनी केलाय, तर राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले की “देशातील सर्वात महाग वीज असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर लागतो. परंतु, वीज वितरण व्यवस्थेचं सक्षमीकरण करण्यासाठी आपलं राज्य सरकार प्रयत्न करताना दिसून येत नाही”

या पत्रकार परिषदेमध्ये ‘आप’ चे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक, राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन, राष्ट्रीय सह-सचिव रूबेन मास्करेहनस तसेच ‘आप’ राज्य समितीचे सदस्य उपस्थित होते.

News by Praful Kedare

MediaBharatNews

Related Posts
comments
  • nice platfrm news & awearness
    thanks to all our gruop

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!