ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचं लसीकरण कधी ? राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचा सवाल !

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचं लसीकरण कधी ? राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचा सवाल !

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचं लसीकरण कधी ? राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचा सवाल !

दहावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहिर केलाय. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचं कोरोनाप्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर व्हावं, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने केली आहे. संघटनेचे उल्हासनगर शहर अध्यक्ष राजेश मदने यांनी त्या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय.

दहावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होऊ घातल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर विलगीकरण कक्षाची व्यवस्था असणार आहे. परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थ्यात कोविड लक्षणे आढळल्यास इच्छुक विद्यार्थ्याला उर्वरित प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी त्याची विलगीकरण कक्षात बैठक व्यवस्था केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर नजिकचे शासकीय आरोग्य केंद्र आवश्यक मदत पुरवणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवासासाठीची सवलतही देण्यावर शासन विचार करतंय. एकंदरीत दहावीच्या परीक्षेसाठी शासन सज्ज झालंय.

बोर्डाच्या परीक्षेदरम्यान पर्यवेक्षण करणारे शिक्षक आणि बोर्डाचे अधिकारी यांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याप्रमाणे त्यांना Frontline Workers समजून प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्याबाबत मी राज्याच्या मुख्य सचिवांशी बोललीय, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवरून घोषित केलं होतं.

त्यानुसार, विविध आस्थापनांतील शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचं काम अनेक जिल्ह्यांत सुरूही झालंय.

नवीन कोविड रुग्ण वाढीस लागल्याची बाब लक्षात घेता परीक्षेच्या किमान एक महिना आधी लसीकरण होणं गरजेचं असताना ठाणे जिल्हयात अद्याप लसीकरणाबाबत परिपत्रक निघालेलं नाही, याकडे राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे उल्हासनगर शहर अध्यक्ष राजेश मदने यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

ठाणे जिल्ह्यातील खाजगी अनुदानित, विना अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा सर्वच क्षैत्रातील शिक्षकांचं तातडीने लसीकरण व्हावं, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने केली आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!