राज्यात सिनेनाट्यगृहांना आजपासून परवानगी

राज्यात सिनेनाट्यगृहांना आजपासून परवानगी

राज्यात सिनेनाट्यगृहांना आजपासून परवानगी

राज्य शासनाने सिनेमागृह, नाट्यगृह तसंच क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु त्यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात येणार आहेत. त्या खालीलप्रमाणे असणार आहेत.

राज्य , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटूंच्या प्रशिक्षणाकरिता स्विमींग पूल सुरू करण्याची मुभा असेल. यासंदर्भात विभागाकडून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं अनिवार्य असेल.

कोविड १९ साथरोगासंदर्भात आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचं अधीन राहून योगा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मुभा असेल.

सर्व प्रकारचे इनडोअर खेळ जसे की बॅडमिंटन, टेनिस इत्यादींना परवानगी असेल.

सिनेमा हॉल चित्रपटगृहे, थिअेटर्स, मल्टिप्लेक्स,ड्रामा थिअेटर इत्यादींना त्यांच्या आसनक्षमतेच्या कमाल ५० टक्के मर्यादेत सदर व्यवसाय सुरू करण्याची मुभा असेल ; तथापि सिनेमा हॉल, चित्रपटगृहे, थिअेटर्स, मल्टिप्लेक्स, ड्रामा थिअेटरच्या आत कुठलेही खाद्यपदार्थ नेण्यास मनाई असेल. यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशांचं पालन करणं अनिवार्य असेल.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!