भारताच्या माजी राजदुताचा बेडच्या प्रतिक्षेत कारमध्येच तडफडत मृत्यू !

भारताच्या माजी राजदुताचा बेडच्या प्रतिक्षेत कारमध्येच तडफडत मृत्यू !

भारताच्या माजी राजदुताचा बेडच्या प्रतिक्षेत कारमध्येच तडफडत मृत्यू !

भारतीय विदेश सेवेतील अधिकारी अशोक अमरोही यांचं कोविड आजाराने निधन झालं. कतार सहित अनेक देशांनी यांच्या मृत्यू वर शोक व्यक्त केला आहे. ब्रुनेई, मोझांबिक, अल्जेरिया या देशात भारताचे राजदूत म्हणून कामगिरी बजावलेल्या अशोक अमरोही यांचा मृत्यू हॉस्पिटल इमारतीच्या पार्किंगमध्ये बेडची प्रतीक्षा करता झाला आणि भारतीय आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे तसंच केंद्र सरकारच्या बनावट दाव्यांची पोलखोल त्यांच्या मृत्यूच्या बातमीसोबत जगभर गेली.

विदेश मंत्री एस जयशंकर यांनी अमरोही यांचा मृत्यू धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवर दिली खरी, परंतु त्यांच्या ट्वीटवर विदेश मंत्र्यांना लोकांच्या असंतोषाला सामोरं जावं लागत आहे. अपयशी सरकारने अशोक अमरोही यांचा बळी घेतला, हे तुम्ही का कबूल करत नाही, असा सवाल नेटकऱ्यांनी एस जयशंकर यांना केला आहे.

 

या घटनेसंदर्भात अशोक अमरोही यांच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती अधिक धक्कादायक आहे. अमरोही यांना कोविडबाधा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार गुडगावमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये संपर्क केल्यानंतर ‘रात्री आठ वाजता त्यांना घेऊन या’ असा निरोप रुग्णालयाकडून प्राप्त झाला होता.

आठऐवजी सदर कुटुंबीय साडेसात वाजताच हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पोहोचलं. त्यांना टोकन नंबरही देण्यात आला ; परंतु दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेत रुग्णालयाने प्रचंड वेळ घालवला.

अमरोही यांचा मुलगा एडमिशन प्रक्रियेसाठी हॉस्पिटलमधील रांगेत उभा होता, त्याच वेळी अशोक अमरोही आपल्या कारमध्ये पुढच्या सीटवर उपचार सुरू होण्याची वाट बघत बसून होते. मात्र हळुहळू त्यांची तब्येत बिघडू लागली, तशी त्यांची पत्नी यामिनी यांची धावाधाव सुरू झाली.

‘माझ्या पतीची तब्येत बिघडते आहे, कोणीतरी लक्ष द्या’, असा त्यांचा आकांत सुरू होता, परंतु अमरोही यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. जवळजवळ पाच तास ते पार्किंगमधील कारमध्ये मृत्यूशी झुंजत राहिले, त्यांची पत्नी मदतीसाठी याचना करीत राहिली आणि मुलगा असहाय्यपणे प्रक्रियेच्या रांगेत उभा होता. एडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली, तोवर अशोक अमरोही यांना मृत्यूने गाठलं होतं.

अमरोही यांच्या कुटुंबाचा उघड आरोप आहे आहे की त्यांचा मृत्यू कोविडने झालेला नसून तो अव्यवस्थेमुळे झाला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोहित यांनी विदेश मंत्री एस जयशंकर यांच्या ट्विटवर तिखट प्रतिक्रिया दिली.

सरकारच्या साथीच्या ‘अपयशा’वर ‘एकतर्फी’ जागतिक माध्यमांच्या कथनाचा प्रतिकार करा, असं एस जयशंकर भारतीय मुत्सद्दींना सांगतात ; पण तुमचे सहकारी अशोक अमरोही आयएफएस, माजी राजदूत यांचे ५ तासांच्या प्रतीक्षेनंतर रुग्णालयाबाहेर निधन झाले. परराष्ट्र मंत्री महोदय, यावेळी केंद्र सरकारचे तुमचे आयएफएस सहकारीही खोटे बोलणार नाहीत. अशा शब्दांत मोईत्रा यांनी ताशेरे ओढले आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!