पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणासाठी अपाॅईंटमेंट कशी मिळेल?

पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणासाठी अपाॅईंटमेंट कशी मिळेल?

पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणासाठी अपाॅईंटमेंट कशी मिळेल?

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना या तीन लसीकरण केंद्रावर वय वर्ष १८ ते ४४ वयोगटामधील नागरीकांचे लसीकरण करण्यात येत आहे. सदर वयोगटामधील नागरीकांनी लसीकरणाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आज सायंकाळी ७.३० पुर्वी www.cowin.gov.in/Aarogya Setu App वरती पुर्व नोंदणी ( Register yourself) करावी.

पुर्वनोंदणी नंतर सायंकाळी ७.३० वाजता उद्यासाठी Appointment घेण्याकरीता www.cowin.gov.in / Aarogya Setu App मध्ये Schedule मध्ये क्लिक करुन त्यानंतर Schedule now वर Click करावे. त्यानंतर पिन कोड टाकावा व सर्च करावे.

आपणास उद्याची तारीख व वरील नमुद सेंटर च्या नावासमोर २०० इतकी संख्या दिसेल. २०० या संख्येवर Click करावे व कोणत्याही Time Slot ची निवड करावी व Appointment Confirim करावी. अशा पध्दतीने Appointment मिळाल्यानंतर आपणास Appointment Schedule झाल्याचा संदेश प्राप्त होईल.

उपरोक्त नमूद पध्दती प्रमाणे Appointment घेणेकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय यासाठी ४११ ०२६, नवीन जिजामाता रुग्णालय यासाठी ४११ ०१७ व प्रेमलोक पार्क दवाखाना यासाठी ४११०३३ हा पिन कोड वापरावा.

वरील तीन लसीकरण केंद्रांच्या ठिकाणची Appointment Book करून लसीकरणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी व महापालिकेला सहकार्य करावे, असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!