काँग्रेसप्रमाणेच सत्तेचे राजकारण भाजपाला भ्रष्ट करेल ; फ्रेंच संशोधकाने केली होती भविष्यवाणी !!

काँग्रेसप्रमाणेच सत्तेचे राजकारण भाजपाला भ्रष्ट करेल ; फ्रेंच संशोधकाने केली होती भविष्यवाणी !!

काँग्रेसप्रमाणेच सत्तेचे राजकारण भाजपाला भ्रष्ट करेल ; फ्रेंच संशोधकाने केली होती भविष्यवाणी !!

फ्रेंच राजकीय संशोधक ख्रिस्तोफ जेफर्लोट यांनी २८ वर्षांपूर्वी केलेल्या संशोधनात भाजपाच्या भवितव्याबद्दल साशंकता व्यक्त केली होती. काँग्रेसप्रमाणेच सत्तेचे राजकारण भाजपाला भ्रष्ट करेल आणि त्यामुळे या पक्षातील गटबाजी वाढेल तसेच अंतर्गत संघर्ष तीव्र होतील, अशी त्यांची भविष्यवाणी होती. भाजपाई राजकारणाच्या मोदीशहा पर्वाने ती भविष्यवाणी खरी ठरवली आहे.

ख्रिस्तोफ जेफर्लोट या फ्रेंच संशोधकांने 1993 साली पॅरिस येथे लेस नॅशनलिस्ट हिंदुस हा ग्रंथ लिहिला होता. त्याचे इंग्रजी भाषांतर ‘ द हिंदू नॅशनलिस्ट मुव्हमेंट एन्ड इंडियन पॉलिटिक्स‘ 1996 मध्ये व्हायकिंग पेंग्विन इंडिया या संस्थेने प्रकाशित केलं होतं.

५९२ पृष्ठांच्या या ग्रंथात जनसंघ आणि भाजपचा विस्तृत अभ्यास सामावलेला आहे. आर्य समाजाच्या १८७३ साली झालेल्या स्थापनेपासून 1997 साली झालेल्या भारतातील विधानसभा निवडणुकीपर्यंतचा एकशे वीस वर्षांचा कालखंड या ग्रंथाने व्यापला आहे. या विस्तृत कालखंडातील हिंदू-राष्ट्रवादी चळवळीच्या भारतीय राजकारणावर झालेल्या परिणामांचे विश्लेषण या ग्रंथात केले आहे.

हे विश्लेषण जरी प्रामुख्याने मध्य प्रदेशातील घटनांच्या आधारे केले असले तरी ते अखिल भारतीय परिमाणाच्या आणि संदर्भाच्या विस्तृत पटलाच्या पार्श्‍वभूमीवर केले गेले आहे.

ख्रिस्तोफ जेफर्लोट यांच्या मते जनसंघ स्थापन करण्यात आला, त्यावेळची दिरंगाई आणि कटुता भाजपची स्थापना करताना निर्माण झाली नाही; पण जनसंघाचे ध्येय-धोरण जसे विशेष मदत न होता निश्चित झाले, तसे मात्र भाजपाच्या बाबतीत झाले नाही.

जनता पक्षाचे गांधीवादी, समाजवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी वैचारिक ओझे भाजपाला डोईजड झाले. याचा परिणाम म्हणून भाजपाला आपले ध्येय धोरण निश्चित करताना बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या. या तडजोडी पक्ष कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या परंपरागत पाठीराख्यांना मंजूर झाल्या नाहीत.

भाजपाने आपल्या खांद्यावरून काढलेली हिंदुत्वाची शान काँग्रेसने अलगदपणे पांघरली आणि 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला धूळ चारली. जनता पक्षाचा वारस म्हणून मिरवण्यात आपली चूक झाल्याचे भाजपाच्या लक्षात आले ; पण तेव्हा फारच उशीर झाला होता.

आपल्या ग्रंथातील द मेकिंग ऑफ हिंदू वोट या प्रकरणात लेखकाने संघ परिवाराच्या रामजन्मभूमी आंदोलनाचे आणि त्यातील भाजपाच्या भूमिकेचे सविस्तर विवेचन केले आहे.

लेखकाच्या मते भाजपाने अत्यंत चाणाक्षपणे या आंदोलना बरोबरच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याशी देवाण-घेवाण करून 1989 सालच्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटप निश्चित केले. या चाणाक्षपणामुळेच भाजपाला 1989 सालच्या निवडणुकीत 85 जागा मिळाल्या आणि त्यापाठोपाठ झालेल्या उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्याच्या निवडणुकीत बहुमत मिळवून भाजपात येथे सत्तारूढ झाला.

या ग्रंथाच्या अंतिम निष्कर्षात ख्रिस्तोफ जेफर्लोट यांनी भाजपाच्या भवितव्याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. काँग्रेसप्रमाणेच सत्तेचे राजकारण भाजपाला भ्रष्ट करेल आणि त्यामुळे या पक्षातील गटबाजी वाढेल तसेच अंतर्गत संघर्ष तीव्र होतील, अशी त्यांनी भविष्यवाणी केली आहे.

हिंदुत्वाच्या एकांगी राजकारणामुळे आर्थिक सामाजिक प्रश्नांकडे भाजपाचे दुर्लक्ष होईल, अशी त्यांनी शंका उपस्थित केली आहे. संघ परिवारातील मतभेद वाढल्यास भाजपाला निवडणुका जिंकण्यासाठी आपली पक्ष संघटना विस्तारित करून सुदृढ करावी लागेल ; पण भाजपाचे आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने पक्षसंघटना कुंठित आहे व ती तशीच राहील, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

( भारतीय विचार दर्शन पत्रिकेच्या जनसंघ ते भाजपा या पुस्तकातील पाश्चात्य अभ्यासकाच्या दृष्टीकोनातून जनसंघ या प्रकरणातून )

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!