गौतम अदानींच्या पत्नीपुढे झुकले होते पीएम मोदी ?

गौतम अदानींच्या पत्नीपुढे झुकले होते पीएम मोदी ?

गौतम अदानींच्या पत्नीपुढे झुकले होते पीएम मोदी ?

हा प्रश्न आजचा कळीचा मुद्दा आहे, कारण तसं छायाचित्र समाजमाध्यमात पसरलंय. त्यात स्पष्ट दिसतंय की पीएम मोदी उद्योगपती गौतम अदानींच्या पत्नीपुढे झुकून नमस्कार करताहेत. पण खरंच असं घडलंय का?

मोदी सरकारवर ते अंबानीअदानींसाठी राबत असल्याचा आरोप सातत्याने होत आलाय. मोदी सरकारने घेतलेले अनेक निर्णय या संशयात भर घालणारे ठरलेत. किंबहुना, सरकारच अंबानीअदानी चालवत असल्याचा आरोपही केला जातो. त्यामुळे, गौतम अदानींच्या पत्नीपुढे मोदी झुकले असतील, यावर पटकन एखाद्याचा विश्वास बसू शकतो.

पण सत्य हे आहे की छायाचित्रातील महिला गौतम अदानींची पत्नी प्रीती अदानी नाहीत.

त्या आहेत दिपिका मोंडोल. दीपज्योती कल्चर आॅर्गनायझेशन एन्ड वेल्फेअर सोसायटी ह्या दिल्लीतील एनजीओच्या चीफ फन्क्शनल अधिकारी ! त्यांचे पती समर मोंडोल राष्ट्रपती भवनातील छायाचित्रकार म्हणून निवृत्त झालेत. आठ राष्ट्रपतींची कारकीर्द त्यांनी पाहिलीय. छायाचित्र प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळातलं आहे.

राष्ट्रपती भवनातील एका कार्यक्रमात मोदी आलेले असताना, दिपिका यांनी मोदींचं स्वागत केलं, तेव्हा मोदींनी त्यांना विचारलं, आपण काय करता, तेव्हा दिपिका म्हणाल्या, मी सोशल वर्कर आहे ; त्यावर मोदींनी म्हटलं, नमस्ते माताजी ! त्याच क्षणांचं हे छायाचित्र ! जे खोडसाळपणे पसरवलं जात आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!