मुंबईतील बसडेपोचं जाॅनी वाॅकर कलादालन व्हावं ! कायद्याने वागा लोकचळवळीची मागणी !!

मुंबईतील बसडेपोचं जाॅनी वाॅकर कलादालन व्हावं ! कायद्याने वागा लोकचळवळीची मागणी !!

मुंबईतील बसडेपोचं जाॅनी वाॅकर कलादालन व्हावं ! कायद्याने वागा लोकचळवळीची मागणी !!

दादर येथील एखाद्या बेस्ट डेपोचे बदरुद्दीन जमालुद्दीन काझी अर्थात अभिनेता जॉनी वॉकर यांचे स्मृतीप्रीत्यर्थ कलादालनात रुपांतर करण्याची मागणी कायद्याने वागा लोकचळवळीने केली आहे. तसं निवेदन मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देण्यात आलंय. सदरबाबत मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन अस्लम शेख यांनी कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांना दिलं.


भारतीय सिनेरसिकांबर अभिनेता जॉनी वॉकर यांच्या अभिनयाची जादू आहे. हिंदी सिनेमावर जॉनी वॉकर या नावाची स्वतंत्र छाप आहे. जॉनी वॉकर हे नाव त्यांना अभिनेता-दिग्दर्शक गुरुदत्त यांनी दिले. त्यांचे मूळ नाव, बदरुद्दीन जमालुद्दीन काझी! बदरुद्दीन जमालुद्दीन काझी लहानपणी मुंबईत आल्यावर त्यांनी पोटापाण्यासाठी अनेक कष्टाची कामं केलीत.

त्यात उल्लेखनीय बाब अशी की ते बेस्टमध्ये वाहक म्हणूनसुध्दा नोकरीत होते. दादर डेपोत त्यांनी वाहक म्हणून सेवा बजावल्याचं त्यांच्याबद्दलची उपलब्ध माहिती सांगते.

बेस्टमध्ये वाहक म्हणून काम करत असतानाच ते कधीतरी कोणीतरी पाहिल आणि आपणांस अभिनयाची संधी मिळेल या आशेवर फावल्या वेळात अभिनय/नकला करून लोकांचं मनोरंजन करीत. नूर महंमद चार्ली यांची ते बेमालूम नक्कल करीत. असंच त्यांना एक दिवस बलराज साहनी यांनी पाहिलं आणि काझींचा सिनेक्षेत्रात प्रवेश झाला.

गुरूदत्त यांनी त्यांना नवं नाव दिलं, जॉनी वॉकर ! कारण ते नशेत असलेल्या व्यक्तिचा अभिनय जबरदस्त करीत.

२२ नोव्हेंबर, १९२६ चा जॉनी वॉकर यांचा जन्म आहे. महिन्याभरात त्यांची ९५ वी जयंती येईल. तत्पूर्वी मुंबईतील एखाद्या बसडेपोचं कलादालन स्वरुपात नूतनीकरण करून त्यास बदरुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर बस डेपो असं नामकरण होऊन एका अभिनेत्याप्रती आपण कृतज्ञता दर्शवू शकतो का, याबाबत सकारात्मक विचार व्हावा. असं निवेदन कायद्याने वागा लोकचळवळीच्या वतीने देण्यात आलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!