कोल्हापुरात ३ जानेवारीला खिळेमुक्त झाडांसाठी मोहिम !

कोल्हापुरात ३ जानेवारीला खिळेमुक्त झाडांसाठी मोहिम !

कोल्हापुरात ३ जानेवारीला खिळेमुक्त झाडांसाठी मोहिम !

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने सावित्रीबाई फुले जयंतीदिनापासून “खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर” हा व्यापक उपक्रम कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने संपूर्ण कोल्हापूरमध्ये राबविण्यात येणार आहे.

कोल्हापूर शहरात अनेक झाडांवर खिळे मारून जाहीरात करण्यात आली आहे. या झाडांचे संवर्धन व्हावे, यासाठी ज्या लोकांनी अथवा व्यावसायिकांनी झाडांवर खिळे मारून जाहीरात अथवा कोणत्याही प्रकारचे फलक लावले असतील, त्यांनी 3 जानेवारीपूर्वी स्वतःहून खिळ्यासह फलक काढून घ्यावेत, असे आवाहन सतेज पाटील यांनी एका बैठकीत केलं.

या बैठकीला हॉटेल मालक संघटना, रोटरी क्लब, वृक्षप्रेमी संघटना, कोल्हापूर जिल्हा माऊंटनेरिंग असोसिएशन, रॉबिनहूड संस्था, अवनी संस्था, व्हाइट आर्मी, निसर्गमित्र, विज्ञान प्रबोधिनी यांच्यासह सुमारे 50 संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

वृक्षारोपण जशी काळाची गरज आहे, तशीच वृक्ष संवर्धनसुद्धा तितकंच महत्वाचं आहे, असं मत व्यक्त करीत सर्व कोल्हापूरवासियांना शहरातील झाडांच्या संवर्धनासाठी खिळेमुक्त झाड मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन पाटील यांनी केलं आहे.

३ जानेवारी रोजी होणाऱ्या या मोहीमेबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसंच मोहिमेत सहभागी होण्यासाठी 9022909599 या नंबरवर मिसड कॉल द्यावा, असंही पाटील यांनी म्हटलंय.


आपल्या भागातील घडामोडी आम्हाला कळवा : mediabharatnews@gmail.com / 8530855558

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!