युपीत तसेही लेबर लॉ कागदावरच !

युपीत तसेही लेबर लॉ कागदावरच !

युपीत तसेही लेबर लॉ कागदावरच !

गावी चालल्या मजुरांमुळे मला सतत एक लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवतेय. एकदा सूर्य आणि वारा यांच्यात कोण श्रेष्ठ अशी स्पर्धा लागली. एक माणूस रस्त्याने घोंगडी पांघरून चालला होता. दोघांपैकी जो कोणी त्याची घोंगडी अंगावरून उडवेल तो श्रेष्ठ अशी पैज लागली.

प्रथम वारा जोरात वाहू लागला. त्यामुळे मात्र माणसाने घोंगडी जास्तच लपेटून घेतली. वाऱ्याने खूप प्रयत्न केले पण त्याने घोंगडी सोडली नाही. मग सूर्याने आपले ऊन प्रखर करायला सुरुवात केली. ते एवढे प्रखर झाले की माणसाने घोंगडी टाकून देऊन पाण्यात उडी मारली. नोटबंदी हे जर वाऱ्याचे प्रयत्न असतील तर लॉक डाऊन हे सूर्याने डोळे वटारल्यामुळे मजूर फक्त जीव वाचवून पळत आहेत.

आता खरे तर गरज त्यांच्या पुनर्वसनाची आहे. यु पी, एम पी ही राज्ये लेबर लॉ बदलत आहेत आणि त्यांना वाटतंय की हे मजूर नाईलाजाने कमी पगारात काम करायला तयार होतील. पण काही वर्षे तरी त्यांना अस्तित्वाची लढाईच लढायची आहे.

मी यु पी मध्ये दोन वर्षे राहिले आहे. लेबर लॉ कागदावरच आहेत. लॅब मॅनेजर अशो पोस्ट असलेल्या माणसाची ड्युटी 12 तास, महिन्याला 2 च सुट्ट्या ( रविवार) आणि पगार 6000 ही स्थिती आहे. त्यांचे तिकडे घर असल्याने परवडू शकते. पण घर नसेल तर कोणीही अशी नोकरी करणार नाही.
त्यातून तिथे आत्ता काहीच उद्योग नाहीयेत. ते उभे करणाऱ्या लोकांची सुदधा परिस्थिती वाईट आहे. तर ह्या राज्यांनी आत्ता मजुरांना अन्न वस्त्र निवारा कसा पुरवता येईल ते बघावे, असे मला वाटते.

– डाॅ. मंजिरी मणेरीकर


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!