साहिर : स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता शायर

साहिर : स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता शायर

साहिर : स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता शायर

आज ८मार्च ! साहिर साहेबांचा जन्मदिवस! पण माझ्यासाठी अनेकदा सकाळ साहिरमय असते….(साहिर म्हणजे जादूगार)

ह्या शायरच्या गीतांचा हात धरुनच मी यौवनात पदार्पण केले. माझी आई व बाबा (प्रा.टी. वी.माखीजानी) साहित्य, हिंदी सिनेमा आणि गाण्याचे वेड असलेले आहेत. आजही ८५ वर्षाचे वय असूनही रोज २ चित्रपट पाहतात आणि १० जुनी गाणी ऐकतात.

मी मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्यांनी मला साहिर-अमृता बद्दल सांगितले आणि मी हे गाणं ऐकलं:

ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करें?
मुहब्बत कर तो लें लेकिन मुहब्बत रास आये भी,

दिलों को बोझ लगते हैं कभी जुल्फ़ो के साये भी
मुहब्बत हीँ का गम तन्हा नही,हम क्या करें??

पुढे उच्च, उदात्त प्रेम म्हणजे काय? हेही साहिरकडूनच शिकले.

तुम अपना रंजो गम
अपनी परेशानी मुझे दे दे
मैं देखूँ तो सही दुनिया तुम्हें कैसे सताती है,

कोई दिन के लिए अपनी निगेहबानी मुझे दे दो…….

( निगेहबानी=काळजी घेणे)

मी पण बघतेच ना कि दुनिया कशी तुला त्रास देते,
काही दिवसांकरिता तुझी काळजी घेण्याचा हक्क तरी मला दे फक्त, भले प्रेम करु नकोस…..

एवढं नि:स्वार्थ प्रेम कोणी करू शकतं का?

सामाजिक आशयाची अनेक गीते, कविता साहिर यांनी लिहिल्या आहेत. गरीब, मजूर, शोषित पीडितांसाठी ज्या कविता आहेत त्या मनाला थेट भिड़तात….

आज भी बूंदें बरसेंगी
आज भी बादल छाए हैं
और कवि इस सोच में है
फसलें काट के मेहनतकश ,
गल्ले के ढेर लगाएंगे
जागीरों के मालिक आकर
सब पूंजी ले जाएंगे
आज भी जनता भूखी है
और कल भी जनता तरसी थी
आज भी बादल छाए हैं
आज भी बूंदें बरसेंगी
और कवि इस सोच में है….

(‘तल्खियां’ ह्या काव्यसंग्रहामधून)

आजच्या दुखी निराश तरुणांनी त्यांची ही गीते ऐकावीत…

ना मुँह छिपाके जियो और न सर झुका के जीयो
गमो का दौर भी आये तो मुस्कुराके जियो

न जाने कौनसा पल मौत की अमानत हो?
हर एक पल की खुशी को गले लगाके जीयो

(हमराज, महेंद्र कपूर, संगीत : रवि)

तब्बल ५० वर्षा पूर्वी लिहिलेलं हे गाणं तरुणांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढू शकतं आणि आज कोरोनाच्या संकटामधे हा एक जागतिक संदेश नाही का वाटत?

खुदा -ए- बरतर,,तेरी जमीन पर
जमीं की खातिर ये जंग क्यूँ है…..??

(ताजमहल-लता -संगीत : रोशन)

साहिर ह्यांनी अनेक विरहगीते लिहिली आहेत ; पण असेही नाही की ते सतत निराशेचा सूर लावतात! दुर्दम्य आशावाद हे त्यांच्या गीतांचे, शायरीचे बलस्थान आहे.

बघा:
जिस सुबह की खातिर जुग जुग से,
हम सब मर मर के जीते हैं,
जिस सुबह के अमृत की धुन में,
हम जहर के प्याले पीते हैं,
इन भूखी प्यासी रुहों पर
एक दिन तो करम फरमाएगी

वो सुबह कभी तो आएगी…..

(फिर सुबह होगी–मुकेश आशा- खय्याम)

आणि योगायोग बघा की ह्या शायराचा जन्म ८ मार्च
म्हणजेच महिला दिनी झालाय! त्याच्या अनेक गीतांमधे स्त्री-मुक्तिवादी विचार ठळकपणे दिसतात. पण त्यांनी कधीच ‘झंडा उठाओ..’ प्रकारचे विधान केले नाही.

साहिरचं हे गीत बघा:

रिवाजों की परवाह न रस्मों का डर है
तेरी आंख के फैसले पर नज़र है
(तेरे प्यार का आसरा…धूल का फूल,महेंद्र कपूर-लता,रवि)

मला रुढी-परंपरांची पर्वा नाही ; पण तिच्या डोळ्यांनी होकार दिला तर आणि तरच..मी पुढे जाईन नाही तर गुपचुप निघून जाईन…पण तिच्यावर ऍसिड फेकणं, तिला मारून टाकणं, तिचं लग्न झालं असलं तर तिच्या नवऱ्याचा छळ करणं….अश्या भानगडी नाहीत ; कारण असे आततायी परिणाम बघून आजकाल मुली नकार द्यायला पण घाबरतात.
पिंक सिनेमातलं संपूर्ण सार ह्या दोन ओळींत आलंय.….
NO means NO….!!

एका गाण्यात हा शायर नायिकेला म्हणतो :

जिंदगी भीख में नही मिलती,
जिंदगी बढ़के छीनी जाती है
अपना हक संगदिल जमाने से
छीन पाओ …..तो कोई बात बने

(पोंछकर अश्क-रफी-नया रास्ता-लक्ष्मी प्यारे)

आईची भूमिका घेऊन लिहिलेली ही तीन गीते, पण प्रत्येकामधे वेगळा मूड

१) मातृत्वाची कोमल अनुभूती:

उसके आने से मेरे आंगन में
खिल उठे फूल मुसकुराई बहार
दे खकर उसको जी नही भरता
चाहे देखूं उसे हजारों बार
मेरे घर आई एक ननहीं परी…..

(कभी कभी- लता-खय्याम)

२) एक आई अशी की जी सूड घ्यायला सांगते :

तू मेरे साथ रहेगा मुन्ने,
मैं तुझे रहम के साये में ना पलने दूगी,
मेरी बरबादी की जमीन अगर आबाद रही,
मैं तुझे दूध ना बक्शुंगी ,,,,तुझे याद रहे….

(त्रिशूल-लता-खय्याम)

३) जीवनाची वाट खडतर आहे असा इशारा देणारी आई:

तेरे बचपन को जवानी की दुआ देती हूं
और दुआ देके परेशान सी हो जाती हूं
कल ये कमजोर सहारा भी ना हासिल होगा
कल तुझे कांटोंभरी राहो पे चलना हो गा….

(मुझे जीने दो-लता-जयदेव)

कारण ह्या गीतातील स्त्री अर्थात नायिका एका क्रूर डाकूची पत्नी असते व त्यामुळे आपल्या मुलाला भविष्यात काय काय भोगावे लागणार आहे ..ही तिची वेदना साहिरनी अचूकपणे टिपली आहे. योगायोग म्हणजे तिन्ही गाणी वहिदावर चित्रित असून लताबाईंनी गायली आहेत!

स्त्री स्वातंत्र्याच ही कल्पना तर कमाल आहे, बघा:

कौन कहता है कि चाहत पे सभी का हक है?
तू जिसे चाहे ,तेरा प्यार उसी का हक है
मुझसे कह दे
मैं तेरा हाथ किसे पेश करूँ……???

(रंग और नूर की बारात-गजल-रफी-मदन मोहन) वाह ! ह्याला म्हणतात खरं स्त्री स्वातंत्र्य!

(तू ज्याच्यावर प्रेम करशील फक्त त्याचाच तुझ्यावर हक्क असेल ! सांग आपल्या तुझा हात कुणाच्या हातात देऊ? असे आपल्या प्रेयसीला विचारणारा प्रियकर कुणी पाहिलाय का?)

आज २१व्या शतकातसुद्धा किती मुली पसंत नसलेलं लग्न नाकारू शकतात किंवा आई वडिलांना सांगू शकतात आपली पसंती नापसंती…? म्हणूनच …साहिर मला मोठा गीतकार वाटतो ! हिंदी चित्रपट गीतांना साहित्यिक उंचीवर नेणाऱ्या काही मोजक्या गीतकारांपैकी ते एक आहेत म्हणूनच असे शायर अमर आहेत. त्यांच्या लेखणीला सलाम!!!

 

 

 

 

डॉ. चारुमित्रा रानडे

योग आयुर्वेद तज्ज्ञ / कला संगीत कार्यक्रम – मैफलींच्या विश्लेषणात्मक निवेदिका

cnr65.cn@gmail.com / ९९८७५६३९४७

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!