गैरसोयींशी झुंजत आरोग्ययोद्धे कसा करणार कोरोनाचा मुकाबला ?

गैरसोयींशी झुंजत आरोग्ययोद्धे कसा करणार कोरोनाचा मुकाबला ?

गैरसोयींशी झुंजत आरोग्ययोद्धे कसा करणार कोरोनाचा मुकाबला ?

कोरोनाचे संकट ओढावल्यापासून स्वतःचा जीव तळहातावर घेऊन नागरिकांचे रक्षणार्थ डॉक्टर, नर्सेस , वॉर्डबॉय, आया, झुंज देतायेत. देशभरातून या कोविड योध्दयांंवर ऋण व्यक्त करण्यासाठी फुले उधळून सलाम ठोकले जात आहेत. परंतु उल्हासनगरमधील कोविड रुग्णालयातील नर्सेस वॉर्डबॉय, आया यांच्याकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

अखेर हा सगळा कर्मचारीवृंद महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात येऊन धडकला, पण त्यांना भेट देण्याचंही सौजन्य आयुक्त समीर उन्हाळे यांनी दाखवलं नाही.

उल्हासनगर ४ येथील शासकीय रुग्णालय हे
तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सर्वप्रथम कोविड रुग्णालय म्हणून उभं केले होते. यात अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर मधील कोरोनाग्रस्त रुग्णांची देखभाल व उपचार केले जातात. परंतु, स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांची सुश्रुशा करणार्या नर्सेसना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतोय.

प्रशासनाच्या निष्काळजीपणा व बेफिकिरीविरोधात नर्सेसनी संताप व्यक्त केला आहे.

या नर्सेस दीड महिन्यांपासून घर ,परिवार सोडून या रुग्णालयात आपली सेवा देत आहेत. या संक्रमित काळात त्यांची राहण्याची व्यवस्था प्रशासनाने शहरातील ईगल आणि अँब्रोसिया हाँटेल्स मध्ये केली आहे. परंतु, या हाँटेल्स व्यवस्थापनाकडून नर्सेस ना आता अप्रत्यक्षपणे बाहेर हाकलण्याच्या दिशेने अपमानास्पद वागणूक दिली जातेय.

नर्सेसच्या खोल्यांची वीज घालवणे, गरम पाण्याचे गिझर, लिफ्ट बंद करणे  ,स्वच्छतेकडेदुर्लक्ष करणे यासारखा त्रास दिला जातोय. या नर्सेसना जेवणही वेळेवर मिळत नसून निकृष्ट चपात्या, भाजी, केस व घाण मिश्रित भात, पोहे, पिण्यास अस्वच्छ पाणी मिळतेय. कमी श्रमबळामुळे चतुर्थ श्रेणीची कामेदेखील त्यांना स्वतःलाच करावी लागत आहेत.

यासंदर्भात नर्सेसचे शिष्टमंडळ मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले होत्या. परंतु, आयुक्तांनी त्यांना भेटण्यास सपशेल नकार दिल्याचं समजतं.

कोविड प्रतिबंधक वैद्यकीय अधिकारी सुहास मोनाळकर यांच्याकडे आयुक्तांनी बोट दाखवलं. मोनाळकर यांनीही त्यावर ठोस उपाय न सुचवता फक्त सारवासारव केली, त्यामुळे वेळीच आपल्या गैरसोयी दुर न केल्यास नर्सेसनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय.

याबाबत उल्हासनगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सांगितलं की संबंधित नर्सेसच्या गैरसोयी दूर करण्याबद्दल आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त मदन सोंडे आणि प्रभाग अधिकारी मनीष हिवरे यांना सूचित केलेलं आहे. आयुक्त स्वत: हाॅटेलचालकांशी बोलले असून निवासाची पंधरा दिवस मुदतवाढ झालीय. सोबत निवासाची पर्यायी व्यवस्थाही कॅम्प पाचमध्ये करण्यात आलीय.

प्रफुल केदारे

लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक आहेत. पत्रकार, साहित्यिक तसंच सामाजिक कार्यकर्ते आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!