पतंजलीच्या औषधाला आता मुस्लिमद्वेषाचा टेकू !

पतंजलीच्या औषधाला आता मुस्लिमद्वेषाचा टेकू !

पतंजलीच्या औषधाला आता मुस्लिमद्वेषाचा टेकू !

राम किसन यादव यांच्या पतंजलीने कोरोनील हे औषध बाजारात आणलं आणि ते कोविडसंसर्ग संपूर्ण बरा करतं, असा दावा केला. तो करण्यापूर्वी पतंजलीने केंद्रीय मंत्रालय आयुषची परवानगी घेतली नव्हती की औषधांची कुठल्याही प्रकारची वैद्यकीय चिकित्सा केलेली नव्हती.

कोरोनीलला विरोध करणारी मंडळी औषधाची परिणामकारकता वैद्यकीय/वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होण्यावरच बोलत आहेत. औषधाला कोणी विरोध केलेला नाही की आयुर्वेदाला कोणी नाकं मुरडलेली नाहीत.

परंतु, पतंजलीच्या औषधाला विरोध म्हणजे आयुर्वेदाला विरोध आणि आयुर्वेदाला विरोध म्हणजे हिंदु धर्माला विरोध अशी अतार्किक मांडणी जोर धरू लागली आहे.

त्यातच मुस्लिमद्वेषाचा मानसिक आजार झालेल्या विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विजय शंकर तिवारी आणि निर्भया बलात्कारातील आरोपींतसुद्धा हिंदूधर्म पाहणारे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठसारख्या लोकांनी या वादालाही हिंदुमुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न केलाय.

आयुषमधील कोणी डॉ. मुजाहिद हुसेनने कोरोनीलवर बंदी घातली व आयुर्वेदाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला व त्याला काढून टाकण्यात आलंय, असा प्रचार हिंदुत्ववाद्यांनी सुरू केला.

जसे यापूर्वी अनेकदा हिंदुत्ववादी आपल्या खोटेपणा मुळे तोंडावर पडलेत, तसंच यावेळीही झालंय. असं कोणालाही काढलं नसल्याचा खुलासा आयुषने अनधिकृतरित्या ट्वीटर अकाऊंटवरून केलाय.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!