सद्य राजकारण ही जेनेटिक विकृती !

सद्य राजकारण ही जेनेटिक विकृती !

सद्य राजकारण ही जेनेटिक विकृती !

आज महाराष्ट्रात ज्या एका राजकीय घडामोडीवरून जवळ जवळ सर्वच माध्यमांतून जे चर्वितचर्वण सुरू आहे, त्याला विचारमंथन म्हणण्याची चूक मी नक्कीच करणार नाही. मुळात एखाद्या व्यक्तीला जर एखादा रोग जडला असेल किंवा विकृती आली असेल तर सर्व प्रथम जी क्रिया महत्वाची असते ती म्हणजे योग्य निदान व त्यानुसार औषधोपचार.

आता घडलेली ही घटना ही क्षणिक अशी आहे. अशी घटना पहिल्यांदाच घडलीय असे नाही. म्हणजे हा रोग जुनाट म्हणजे Cronic आहे. हा रोग कुणा व्यक्तीला झालेला नसून तो येथल्या सबंध समाजालाच जडलाय हे आधी आपण मान्य करायला हवे, तरच त्यावर उपाययोजना होऊ शकते आणि ही अचानक उद्भवलेली कोरोनासारखी महामारी नसून ती जेनेटिक विकृती आहे असे एकंदर लक्षणांवरून दिसते, त्यामुळे  अर्थातच यावरील उपचार हे वरवरच्या लक्षणांवर प्रतिजैवके देऊन नव्हे तर जेनेटिक बदलाच्या शल्यक्रियेनेच होऊ शकतील.

ही जेनेटिक विकृती म्हणजे स्वकियांवर अविश्वास, जातपात, ढोंगी सात्विकता, दिखाऊ नैतिकता वगैरे.

या विकृतींमुळेच मूठभर सुलतान, अफगाणी, मोगल, पोर्तुगीझ, इंग्रज येथल्या प्रचंड लोकख्येवर अत्याचार ,अनाचार व शेकडो वर्ष राज्य करू शकले ; म्हणजे सामान्य भारतीय माणसातच अनैतिकता, दुतोंडीपण, ढोंगीपणा, खोटी सात्विकता, वगैरे दुर्गुण ठासून भरलेले आहेत हे आधी मान्य करायची प्रामाणिकता आपण दाखवायलाच हवी.

अर्थातच यालाही अपवाद आहेत, असतील ; पण ते अपवादच. त्यावरून नियम ठरत नाहीत. YOU GET THE GOVT. YOU DESERVE. असं म्हटलं गेलंय ते उगाचंच असं नाही.

आपण भारतीय सामान्यजन गेल्या अनेक वर्षांपासून संस्थानिकांसारखे एकेका उमेदवाराला दहा दहा वेळा निवडून देत असू तर त्यांच्यात संस्थानिक असल्यागत मुजोरी ही येणारच.

आपल्याला कोणत्याही IDEALOGY पेक्षा नेता महत्वाचा वाटतो. मग तो तुम्हाला गृहीत धरणारच. त्याची तक्रार तुम्ही करू शकत नाहीच. जाब तर विचारूच शकत नाही. त्याला ज्यावेळी जी भूमिका सोयीची वाटेल, फायदेशीर वाटेल ती तो घेणारच, कारण त्याला हे पक्के ठाऊक आहे की जनता कितीही ओरडली , चिडली तरी तिला निवडणुक काळात जात,धर्म,भाषा, या मुद्यांवर भिडवून (तापवून) आणि त्यानेही शक्य न झाल्यास चमकदार जाहिरात, मटण, दारू,पैसे या साधनांनी नक्कीच वश करता येते.

हे मूळ जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत शरद पवार, नारायण राणे, भुजबळ, शिंदे, अजित पवार असे चक्र सुरूच राहणार.

 

 

 

सुदेश मालवणकर

पत्रकार/ सामाजिक कार्यकर्ता / राजकीय अभ्यासक

sudeshmalvankar1@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!