सुशांतला बिहारी म्हणून सहानुभूती आणि रियाआडून बंगाली महिलांविरोधात बदनामीची मोहिम ! कोलकोता पोलिसांनी घेतली दखल !!

सुशांतला बिहारी म्हणून सहानुभूती आणि रियाआडून बंगाली महिलांविरोधात बदनामीची मोहिम ! कोलकोता पोलिसांनी घेतली दखल !!

सुशांतला बिहारी म्हणून सहानुभूती आणि रियाआडून बंगाली महिलांविरोधात बदनामीची मोहिम ! कोलकोता पोलिसांनी घेतली दखल !!

विखार आणि विद्वेष ही हळूहळू भारतीयत्वाची ओळख होईल की काय, अशी परिस्थिती सद्या देशात आहे. प्रत्येक घटना जातीयवादी वळणावर घेऊन जात तिच्या राजकियीकरणाची स्पर्धा सुरु होऊन मूळ घटनेतलं गांभिर्य कुठल्या कुठे हरवून जातं पत्ताही लागत नाही. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा मुद्दा बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातल्या केंद्रस्थानी आला तर संशयित आरोपी रिया चक्रवर्तीवरून समस्त बंगाली महिलांना लक्ष्य करण्यावरून युपीबिहारी आणि बंगाली आमने-सामने आले आहेत.

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूत कसलाही घातपात नसल्याचं मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आलंय. पण रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार करण्याच्या बहाण्याने सुशांतच्या कुटुंबाने हे प्रकरण पूर्वनियोजितरित्या बिहार पोलिसांत नेलं. ज्यात सुशांतच्या परिवारातील बिहारमधील भाजपा आमदाराची महत्त्वाची भूमिका असल्याचं बोललं जातं. सुशांतचा मृत्यू जो आधी सिनेसृष्टीतील परिवारवादाचा बळी मानला जात होता, तो अचानक बिहारी व्यक्तिचा मृत्यू म्हणून मांडला जाऊ लागला आणि त्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, या मागणीभोवती बिहारचं राजकारण केंद्रीत झालं.

बिहारमध्ये ब्राह्मणानंतरची लोकसंख्या असलेला स्वत:ला उच्चवर्णीय समाज म्हणजे राजपूत समाज. बिहारमधील तब्बल ४० विधानसभा मतदारसंघात राजपूतांची निर्णायक मतं आहेत. त्यामुळेच लालूप्रसादांची राजदसुद्धा सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात सत्ताधारी जेडीयू-भाजपामागे फरफटली आहे. यावरून राजपूत समाजाचा राजकीय प्रभाव लक्षात येऊ शकतो.

पण आता सुशांतसिंगच्या आत्महत्येचा मुद्दा सिनेसृष्टीवरून रिया चक्रवर्तीवर सरकल्यानंतर चर्चेचा सूर बदलला आहे. रिया बंगाली असल्याने समाजमाध्यमातली टोळधाड बंगाली महिलांवर घसरली आहे. काळी जादू करणाऱ्या, स्वार्थासाठी नाती जोडणाऱ्या ( gold diggers ) म्हणून बंगाली महिलांची संभावना करण्यात येत आहे. त्यातच संधी साधून ममता बॅनर्जी यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. या वाह्यातपणाला बंगाली समुदायाकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्याने बिहारी-बंगाली आमने-सामने आलेत.

पण बंगाली महिलांबाबतच्या अवमानकारक मोहिमेविरोधात सामाजिक क्षेत्रातून आवाज उठू लागला आहे. त्यात तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांचाही समावेश आहे. कोलकोता पोलिसांनी सदरबाबत गुन्हे दाखल करायला घेतलेत.

हिंदुत्ववादी मंडळी कोणत्या स्तराला गेलीयंत, याचंच हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया पत्रकार आदित्य मेनन यांनी दिलीय.

बंगाली महिलांविरोधात सदरची मोहिम कोण चालवतंय, याचा अंदाज देणारं एक ट्वीट पुढे देण्यात आलंय.

पश्चिम बंगाल महिला आयोगाने याबाबत माहिती मागवलीय. आयोगाच्या अध्यक्षा लीना गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे अशा तीस तक्रारी प्राप्त आहेत.

लीना गांगुली म्हणतात की याकडे आम्ही बंगाली महिलांचं प्रकरण म्हणून बघत नसून समाजमाध्यमात महिलांना बदनाम करणारी जी प्रवृत्ती आहे, तिची दखल घेतोय. या लोकांचा समज झालाय की आपलं कोणी वाकडं करू शकत नाही.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts
comments
 • विलास काळू यशवंते

  August 7, 2020 at 3:16 am

  अत्यंत घृणास्पद प्रकार सध्या देशात सुरू आहे .
  याआधी सुध्दा हे प्रकार होते नव्हते अस नाही पण ते सुप्त स्वरूपात होते त्याची जाहीर वाच्यता करण्याची कुणाची हिम्मत नव्हती.समाज माध्यमांमुळे आता लोक बिनधास्तपणे बोलायला लागलीत व त्याला मीडिया फोडणी देऊन विषय आणखी hot करण्याचा व्यवस्थित मांडणी करत आहेत. हे सगळे माध्यम त्यांच्या रोजीरोटी साठी देशाचं प्रचंड मोठे नुकसान करीत आहेत.

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!