आदिवासींना मुख्य प्रवाहात आणू म्हणणारे स्वतः अब्जाधीश झाले ; आदिवासी मात्र जिथल्या तिथेच !

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणू म्हणणारे स्वतः अब्जाधीश झाले ; आदिवासी मात्र जिथल्या तिथेच !

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणू म्हणणारे स्वतः अब्जाधीश झाले ; आदिवासी मात्र जिथल्या तिथेच !

“आदिवासी म्हणजे म्युझियम मध्ये ठेवण्याची वस्तू नाही तर आदिवासी म्हणजे इथली आदिमता आहे‌. आमचा विकास करायला आलेले, आदिवासींना मुख्य प्रवाहात आणू म्हणणारे स्वतः अब्जाधीश झाले. आदिवासी मात्र जिथल्या तिथेच !” आपल्या प्रास्ताविकात आदिवासी विकासाचे प्रारूप सांगताना प्रा. डॉ. विनोद कुमरे यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहातील सर्वच विचारमग्न झाले.

‘म्होरकी’ या देशातील पहिल्या आदिवासी स्त्रीविषयक त्रैमासिकाच्या प्रकाशन समारंभात म्होरकी संघटनेचे संस्थापक, समन्वयक डॉ. विनोद कुमरे यांनी आदिवासी समाजाच्या स्थितीगतीचा आढावा आपल्या प्रास्ताविकात मांडला.‌ तसेच आदिवासी स्त्रियांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रगतीची नवी मांडणीही विशद केली.

म्होरकी आदिवासी महिला वेलफेअर असोसिएशन अंतर्गत म्होरकी आदिवासी महिला संघटनेच्या वतीने या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

आदिवासी स्त्रियांचे प्रश्न, समस्या, कला-साहित्यविषयक विचारांना या त्रैमासिकातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कल्याणमधील सामाजिक कार्यकर्त्या आणि माजी नगरसेविका विजया पोटे, कलाताई शिंदे, प्रा. प्राजक्ता शित्रे, प्रा. वृषाली विनायक, म्होरकी संघटनेच्या अध्यक्षा प्रमिला मसराम, सरचिटणीस निशा सवरा, सहसमन्वयक वैशाली कुमरे, अरिफा तडवी आदी मान्यवर म्होरकी त्रैमासिकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित होते.

सर्वांनी सदिच्छापर मनोगत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील आदिवासी स्त्रिया या प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. काही निवडक कार्यकर्त्यांनी सदिच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने आदिवासी स्त्रियांचा सहभाग असलेली म्होरकी ही पहिलीच आदिवासी संघटना आहे‌.

संघटनेच्या सरचिटणीस निशा सवरा यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट करताना, आदिवासी स्त्रियांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकत म्होरकी संघटनेच्या नेतृत्वामुळे‌ आदिवासी समाजातील स्त्रियांना आपल्या प्रगतीसाठी निश्चितच पाठबळ मिळणार असल्याचे नमूद केले.

संघटनेच्या राज्य अध्यक्षा प्रमिला मसराम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात नवीन उपक्रमांची माहिती सांगितली. उपस्थित स्त्रियांच्या कामाचे कौतुक करत अधिकाधिक स्त्रियांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

रेल्वे रूळावरील एका प्रवाशाला वाचवणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या लता बन्सोले नामक युवतीच्या या विशेष कामगिरीबद्दल कार्यक्रमप्रसंगी तिचा सत्कार करण्यात आला.

संघटनेच्या सहसमन्वयक वैशाली कुमरे यांनी म्होरकी संघटनेच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानले.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!