भारतात एक काळ होता, जेव्हा नि:पक्षपाती व निर्भीड निवडणूक आयुक्त होते…

भारतात एक काळ होता, जेव्हा नि:पक्षपाती व निर्भीड निवडणूक आयुक्त होते…

भारतात एक काळ होता, जेव्हा नि:पक्षपाती व निर्भीड निवडणूक आयुक्त होते…

निवडणूक आयोगाचं अस्तित्व ठळकपणे दाखवून देणारे, आयोगात जिवंतपणा आणणारे आणि राजकीय पक्षात व नेत्यांत आचारसंहितेचा धाक निर्माण करणारे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन आज आपल्यात नाहीत. वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीची हवी तशी दखल घेतलेली नसली, तरी समाजमाध्यमात शेषन यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जातेय. कायद्याने वागा लोकचळवळीच्या विविध समुहातील सदस्यांच्या प्रतिक्रियांसह काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आम्ही संकलित केलेल्या आहेत.


राजकारण्यांना लगाम घातला !!

टी.एन.शेषन यांचा कार्यकाळ साधारण आमच्या लहानपणी चा असेल पण जस राजकारण विशेषतः निवडणुका हा विषय येत असे, तेव्हा शेषन हे नाव कानावर पडत असे. निवडणूक प्रक्रियेत आचारसंहिता असते आणि तिचे काटेकोर पालन करायचे असते, हे सामन्य माणसा पर्यंत पोहोचले ते तत्कालीन निवडणूक आयुक्त शेषन यांच्या मुळे…निवडणूक आयोगा सारखे अत्यंत जबाबदारीचे आणि जोखमीचे प्रमुख पद सांभाळत असताना कायद्याच्या चौकटीत राहून आपले अधिकार योग्य तिथे वापरून बेताल, मदमस्त, राजकारण्यांना त्यांनी यथोचित लगाम घातलाच पण सामान्य मतदाराचे लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिये विषयी लोकशिक्षण घडवून आणले. गेल्या काही निवडणुकांतील निवडणूक आयोगाची कामगिरी पाहून आज त्यांची उणीव अधिक तीव्रतेने भासते आहे.

– राकेश पद्माकर मीना

राज्य संघटक, कायद्याने वागा लोकचळवळ

Unlike today, there was a time when our Election Commissioners were impartial, respected, brave & feared. Shri T. N. Seshan was one of them.

– Rahul Gandhi

वादळी व्यक्तीमत्व

श्री. टी. एन शेषन,नावाच्या वादळाचा अंत
निवडणुकीत आचारसंहिता कठोरपणे राबवून घेणारे, वादळी व्यक्तीमत्व..यांच्यामुळेच आज निवडणुका पारदर्शक व नियमानुसार पार पडत आहेत..एका प्रशासकीय अधिका-याने नियमावर बोट ठेवून कायदेशीर काम केले तर काय होऊ शकते हे दाखवून दिले .

– राज पाटील

पत्रकारिता विद्यार्थी

Shri TN Seshan was an outstanding civil servant. He served India with utmost diligence and integrity. His efforts towards electoral reforms have made our democracy stronger and more participative. Pained by his demise. Om Shanti.

– Narendra Modi, PM

राजकारण्यांना सळो की पळो केलं…

१९९० ते १९१६ च्या काळात. पहील्यांदा मतदारांना ओळखपत्र देण्याचं काम निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांनी केलं… राजकारण्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. एक निर्भीड अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बातमी कुठेच नाही…आणि आभार प्रसार माध्यमांचं..‌..ते मात्र बाईट आणि पत्रकार परिषदेत मश्गूल..

– रुपेश इंदुलकर

मूर्ती कलावंत

 

सभागृहाची निवडणूक मतदान केंद्रापर्यंत पोहचवणारा तत्व जपणारा माणूस.

भारताचे माजी निवडूक अधिकारी टि.एन.शेषन यांचे रविवारी रात्री -हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी झळकली. माझ्या पिढीला हे नाव माहिती असण्याचं कारण म्हणजे माझ्या हातातील ‘शेषन कार्ड’. प्रशासकीय सेवेतील कारकीर्द गाजवणा-या काही मोजक्या नावामध्ये शेषन हे नाव सर्वात वरच्या क्रमांकाला आहे.आपल्या धडाकेबाज निर्णयाने ९०चं दशक गाजवणा-या शेषन ह्यांची प्रशासकीय कामाची सुरुवात १९५६ साली झाली.(१९५६ केडर चे IAS ) भारतीय जनमानसात प्रशासकीय अधिकारा-यांबद्दलची मते आजही फारसी सकारात्मक नाहीत, पण शेषण ह्यांची कारकिर्द हेवा वाटावी अशी होती. भारतीय प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पदावरही त्यांनी काही काळ काम केलं. राष्ट्रपती पदाची निवडणूकही त्यांनी लढवली, पण शेषन हे नाव रेमन मॕग्सेसे ला गवसणी घातलं ते त्याच्या ‘मुख्य निवडणूक आयुक्त’ पदावर असताना केलेल्या सुधारणावादी कामामुळे.सार्वजनिक प्रशासकीय शिक्षणाचा उपयोग प्रत्येक्ष कामात कसा करावा ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे टि.एन.शेषन. मुख्य निवडूक आयुत पदावर असताना त्यांनी केलेली धडाकेबाज निर्णय आणि कामे खालील प्रमाणे आहेत.

१)इलेक्शन कार्ड
२)प्रचाराच्या वेळा नियंत्रणात आणणे
३)उमेदवाराचे खर्चाचे तपशील
४)आचारसंहितेचे काटेकोर पालन

भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून,कुठल्याही नविन अध्यादेशाची,कायदा होण्याची वाट पाहिली नाही.कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत आपले अधिकार त्यांनी योग्य प्रकारे वापरले. भारतीय शासनव्यवस्थेचे जे तीन स्तंभ आहेत न्यायव्यवस्था, प्रशासन, कार्यकारी मंडळ. ह्या पैकी ‘प्रशासकीय’ नावाच्या स्तंभाला साजेसा आणि गर्व वाटावा असा हा काळ.

– अंकुश हंबर्डे पाटील,नांदेड

नांदेड जिल्हा समन्वयक, कायद्याने वागा लोकचळवळ


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!