“अ क्वेश्चन ऑफ सायलेन्स”

“अ क्वेश्चन ऑफ सायलेन्स”

“अ क्वेश्चन ऑफ सायलेन्स”

कायद्याने वागा लोकचळवळीच्या सावित्री उत्सवातलं डाॅ. गणेश देवींचं भाषण कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू गाठणारं ठरलं. उपस्थित लोक कितीतरी वेळ त्या भाषणाच्या प्रभावाखाली होते. सोशल नेटवर्किंग वर या भाषणाची चर्चा झाली.‌ अशीच एक फेसबुकवरही पोस्ट लिहिलीय, लेखिका अजिता सोनाले यांनी…

…मग सुरू झाले डॉ. गणेश देवींचे ओघवते, भारून टाकणारे बोलणे. खरंच सांगते अगोदरची एक दोन मिनिटे ते काय बोलताहेत ते डोक्यावरून गेलं.पण नंतर कानात जीव आणून भारल्यागत ऐकतच राहावसं वाटत होतं. खचाखच भरलेल्या सभागृहात पुढची 32 मिनिटे जणू कुणी नव्हतेच.

एका सिनेमापासून सुरू होवून सावित्रीच्या नावाचा सखोल अर्थ सांगत त्यांनी भाषण संपवलं. डॉ. गणेश देवींचे शब्द कायमचे उमटलेत मनात.

ते म्हणाले, त्यांनी एक डार्क बुक लिहिलेले..
डार्क बुक म्हणजे वेडेपणाच्या एका स्टेज मध्ये लिहिलेले पुस्तक….” द क्वेश्चन ऑफ सायलेन्स “

हा डच सिनेमा त्यांनी 1985 मध्ये पाहिला…तेव्हापासून ते अस्वस्थ होते…का ते ही त्यांना कळत नव्हतं…

चित्रपटाची थोडक्यात कथा अशी,
एक मॉल मध्ये आलेल्या एका पुरुषाचा खून होतो..एकाच वेळी, एकमेकींशी अपरिचित अशा तीन स्त्रियांनी तो खून केलेला असतो …त्या तिघींचे त्या माणसाशी काहीही वैर नसताना त्यांना त्या माणसाला मरावसं वाटतं….त्या तिघीही त्याचा खून करतात…त्यांना अटक होते…त्यावेळी डच कायद्याप्रमाणे त्यांना अटक करून, एका मनोविकार तज्ञाकडून, त्यांनी असं का केलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो … त्या तीन स्त्रियांच्या मानसिक उलथापालथीची स्टोरी म्हणजे हा सिनेमा…त्या तिघी त्या मनोविकारतज्ज्ञ पुढे एकही शब्द बोलल्या बोलल्या नाहीत…. म्हणूनच हे नाव… “अ क्वेश्चन ऑफ सायलेन्स”

हे डॉ. देवींना आठवण्याचं कारण म्हणजे त्यांच्या आयुष्यातील तीन स्त्रिया…त्यांची आई, पत्नी, आणि मुलगी…प्रसंगोपात समाजाच्या बंदिस्त रूढी मधिल त्या तिघींचे मौन…किंवा शांतता…त्यांचे शांततेचे शस्त्र म्हणून केलेला वापर…हे ध्यानात आल्यानंतर 85 सालापासून त्यांना ते का अस्वस्थ होते?…हे त्यांना कळलं …म्हणून त्यांनी त्याच नावाने पुस्तक लिहिलं…

इजिप्त आणि भारत यातील ओरिएंटल कल्चरमध्ये सोशल मिडियाने, कौटुंबिकता, सामाजिकता, नैतिकता या सगळ्यांची वाट लावली. एकाच घरात मेसेजेस करुन बोलणं सुरू झालं…हे माणसामाणसातील दुराव्याचा अपरिहार्य कारण ठरलंय….

शास्त्रज्ञ, वस्तू आणि तिची सावली यांच्या अभेद्य जोडीची ताटातूट कशी करावी? हे समजण्यात अपयशी ठरले..हे विश्लेषण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला…या कामात अयशस्वी झाल्यानंतर वस्तूलाच सावली मानण्यात आलं…

“व्हॉट यू सी, बट अ शॅडो ऑफ समथिंग विच यू नेवर सीन… ” म्हणून सावलीची भीती न वाटता वस्तूलाच सावली मानण्यात आलं… हा मानवाचा गेल्या 4000 वर्षातील तत्त्वज्ञानाचा पराभव होता….तो पराभव मानवी बुद्धिमत्तेला फार सलत राहिला…प्रत्येक विषयाच्या सहाय्याने पदार्थ आणि सावली वेगळी करण्यात पराभव झाला… उत्क्रांतीच्या पायऱ्यांवर माणूस एक नवं वळण घेतोय… येणाऱ्या टप्प्यात ज्ञान कमविण्याच्या, देण्याच्या, सगळ्या प्रक्रिया बदललेल्या असतील…मानवी मेंदूमध्ये 86850 कोटी न्यूरॉन्स असतात…तरीही मानव हा तिढा सोडविण्यात अपयशी ठरला.

माणूस आत्तापर्यंत शब्दांच्या सहाय्याने जगाचं एनालिसिस करत होता…. त्याऐवजी आता फक्त सावलीच्या सहाय्याने हे करण्याचं ठरवलं…

शास्त्रज्ञ, माणूस आणि रोबोट्स यांच्या संयोगाने ऑटोनॉमस व्यक्ती बघू लागले.. बनवण्याचा प्रयत्न करू लागले… मग स्त्रीला पुरुषाची आणि पुरुषाला स्त्रीची गरज लागणार नाही…असं त्यांना वाटतं. पण हे अशक्यंय असं डॉ. देवींना वाटतं…उत्क्रांतीच्या वाटेवर माणूस सावित्रीच्या तत्वाकडे निघालेला आहे, असे डॉक्टर गणेश देवी मानतात…सावित्रीबाई फुले ह्या गेल्या या शतकातील असतील तरी अशा सावित्री माणसाच्या भविष्याची ग्वाही देणारे एक अमर तत्त्व, अमर कहाणी आहे….हीच त्यांची सावित्रीची व्याख्या….असा सुंदर उद्गम कुठे पाहायला कदाचित मिळणारही नाही….

सावित्री उत्सवात सावित्रीच्या नावाची ही अतिशय सुंदर व्युत्पत्ती अर्थवाही ठरते…डॉक्टर गणेश देवी यांचे तत्वज्ञान कधी संपूच नये असं वाटत असताना अचानक या अर्थानंतर ते थांबले…. आणि सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात बुडून गेले…


अजिता साने-सोनाले

लेखिका शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त असून त्यांचं पडद्यामागचं गाणं हे पुस्तक प्रकाशित आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!