उपोषणाची यशस्विता

उपोषणाची यशस्विता

उपोषणाची यशस्विता

कायद्याने वागा चळवळीने संविधानात्मक मार्गाने रीतसर पाठपुरावा करून उल्हासनगर मनपा आयुक्तांकडून जे आदेश पदरात पाडून घेतलेत, ते पुढीलप्रमाणे आहेत : –

१. नगररचना विभागातून दिल्या गेलेल्या बाधकाम परवानग्यांच्या पडताळणी आणि सदनिकाधारकांच्या प्रत्यक्ष संमतीशिवाय कोणताही सुधारित आराखडा मंजूर न करण्यासाठी कार्यवाही करावी म्हणून नगररचनाकार यांना आदेश.

२. कर्तव्यात हयगय करणाऱ्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून चौकशीचे आदेश.

३. २००५ नंतरच्या बांधकाम समाप्ती व भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या इमारतीच्या बिल्डर्स, विकासक, वास्तुविशारद यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे नगररचनाकार यांना आदेश.

४. बांधकाम समाप्ती प्रमाणपत्र घेतल्याशिवाय इमारतींना नळ जोडणी, भुयार गटार जोडणी न देणे व करनिर्धारण न करणे यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा नगररचनाकार यांना आदेश.

५. बांधकाम समाप्ती प्रमाणपत्र घेतल्याशिवाय इमारतींना वीज जोडणी देऊ नये, म्हणून महावितरणला लेखी पत्र देण्याचे नगररचनाकार यांना आदेश.

६.बांधकाम प्रमाणपत्र आणि भोगवटा दाखला या संदर्भात जनजागृती करण्याचे नगररचनाकार यांना आदेश.

७. बिल्डरकडून फसवणूक झालेल्या इमारतीतील रहिवाश्यांच्या मागणीवरून बांधकाम समाप्ती व भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्याचे नगररचनाकार यांना आदेश.

८ . फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तातडीने निष्कासन कारवाईचे सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश.

९ . मंजूर विकास आराखड्याची संक्षिप्त महत्वाची माहिती देणारी पुस्तिका मराठी व हिंदी भाषेत प्रकाशित करण्याचे नगररचनाकार यांना आदेश.

१०. . गेल्या ५ वर्षात बनलेल्या पण खराब अवस्थेत असलेल्या सिमेटकॉंक्रीट रस्त्यांच्या बाबतीत दोषी अभियंत्याविरोधात कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे शहर अभियंता यांना आदेश.

११ . मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते यांच्या विकासासाठी बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद करण्यासाठी शहर अभियंता यांना आदेश.

१२ . शहरातील सर्व सदोष स्पीडब्रेकर काढून टाकून नव्याने योग्य मोजमापात बनविण्यासाठी स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर करण्याचे शहर अभियंता यांना आदेश.

१३ . टाऊन हॉल चे कामकाज करारप्रमाणे होते कि नाही याची चौकशी. कराराप्रमाणे नागरिकांना रविवार दिवशी सवलतीच्या दरात हॉल मिळावा म्हणून कार्यवाही करण्याचे , हॉल मध्ये मनपाचा दरफलक लावण्याचे मालमत्ता विभागाला आदेश.

१४. भगवंती नावानी स्टेज आणि म्युजियम साठी स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर करण्याचे व अंदाजपत्रकात तरतूद करण्याचे शहर अभियंता यांना आदेश.

१५ . शहरात प्रत्येक कैम्पात १ अशी ५ वृत्तपत्र वाचनालये व सपना गार्डन मालमत्तेत ग्रंथालय व अभ्यासिका सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे मालमत्ता विभागाला आदेश.

१६ . शहरातील हडपल्या गेलेल्या ६९ हजेरी शेड्सच्या सद्यस्थितीबाबत एका आठवड्यात माहिती सादर करण्याचे प्रभाग अधिकारी यांना आदेश. हजेरी शेड नसलेल्या ठिकाणी मालमत्ता विभागाने जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश.

१७ . शहरातील सर्व समाजमंदिरे ताब्यात घेण्याचे व गैरप्रकार सुरु असलेल्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा मालमत्ता विभागाला आदेश. सदरची समाजमंदिरे नोंदणीकृत संस्थांना चालवायला देण्यासाठी महासभेच्या मंजुरीने नवीन धोरण तयार करणार.

१९ . मनपातील सभागृहनेता, विरोधी पक्षनेता यांच्या बेकायदेशीर नेमणुका आणि इतर गैरव्यवहार संदर्भात विधी तज्ञांचे प्रलंबित अभिप्राय मागवून पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे सचिवांना आदेश.

अजूनही शहराच्या कित्येक समस्या आहेत. कित्येक विषय आहेत. हे कोणा एकट्याचे काम नाही. त्यात लोकांची साथ हवी. ह्या आश्वासनांचा पाठपुरावा करणे माझे एकट्याचे काम नाही. ते व्यवहारिकदृष्ट्या शक्यही नाही. पण पाठपुरावा सुरू आहे. ह्या प्रत्येक विषयात आपणही पत्रव्यवहार करावा, पाठपुरावा करावा, म्हणून आपणास नम्र विनंती करतो.

admin

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!