बिलोलीतील शेतकऱ्यांना टरबूजाची नुकसान भरपाई हवी !

बिलोलीतील शेतकऱ्यांना टरबूजाची नुकसान भरपाई हवी !

बिलोलीतील शेतकऱ्यांना टरबूजाची नुकसान भरपाई हवी !

शेतकऱ्यांचा टरबूज सद्या कवडी मोलाच्या भावाने जात असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. अधिकच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईचा आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी करणारं निवेदन नांदेडमधील बिलोली तहसीलदार कार्यालयाला देण्यात आलं आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कासराळी , गागलेगाव रुद्रापुर, बेळकोणी, कोल्हेबोरगाव, तळणी, डोणगाव,पाचपिपळी, रामपुर,बामणी, चिंचाळा, भोसी, दगडापुर,बामणी व अजुन इतर काही गावातील शेतीमध्ये मागील चार-पाच वर्षांपासून येथे टरबूज उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. याही वर्षी जवळपास दीडशे एक्कर जमिनीत  टरबूज उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे.

पण या वर्षीही करोना महामारीचे संकट व अवकाळी पावसामुळे टरबूजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले आहे, म्हणून  व्यापाऱ्यांनी आता टरबूज खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे.

निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन  कोटपलवार, कामोले हणमंत ,शिवाजी पाटील शिंदे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण लंके , संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, ग्रा.पं. सदस्य माजीद सलीम शेख,  ग्रा पं सदस्य शिवा पाटील कासराळीकर, ग्रा पं सदस्य मारोती भुरे, दत्ताहरी खैरगावे, मारोती शिंदे, शेषराव गजलोड, शिवाजी रामराव पाटील, निलेश पाटील महाजन आदि उपस्थित होते.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!