आशाताई म्हणजे सुंदर मोत्यांची माळ !!!

आशाताई म्हणजे सुंदर मोत्यांची माळ !!!

आशाताई म्हणजे सुंदर मोत्यांची माळ !!!

आशाताई म्हणजे “सुंदर मोत्यांची माळ ” कारण त्यांची प्रत्येक हरकत किंवा गाण्यातील मुर्की ही दाणेदार असते. एक एक मोती ओवून जशी माळ तयार केली जाते अगदी तसंच ताना, मुरक्या, खटके, मींड या सर्व शास्त्रीय संगीतातील पायाभूत आभूषण वापरून त्या प्रत्येक गीतावर आपल्या स्वरांचा साज चढवतात. या सगळ्या सांगीतिक कसरती करताना गाण्याचा भाव कुठेही ढळत नाही, उलट त्या भावना अधिक उत्कटतेने रसिकांपर्यत पोहोचतात.

आशा ताईंची  नवी, जुनी, हिंदी, मराठी, आणि इतर भाषांमधील सगळीच गाणी  खूप विलक्षण आहेत . “RD, आशाताई आणि हेलन” हे कॉम्बिनेशन भन्नाट होतं. हेलन उत्कृष्ट डान्सर होतीच, वादच नाही. त्यात पण आशाताईंचं गाणं नुसतं ऐकलं तरी  हेलन डोळ्यासमोर येते आपोआप आणि दुधात साखर मिसळून जावी तसा आशाताईंचा आवाज हेलन मध्ये मिसळून जातो.

गाण्याचा कुठलाच प्रकार आशाताईंनी सोडला नाही. भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीत, लावण्या, कॅब्रे सॉंग्स, गझल, नाट्यगीत आणि आताशा इंग्रजी गाणी सुद्धा. इतक मोठं वैभव ज्या महान गायिकेकडे आहे त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार.

आशाताईंची अनेक गाणी मला आवडतात. बालपणापासूनच आशा ताईंच्या गाण्याची गोडी लागली होती. सतत पेन्सिल ने कॅसेट रिवाइंड करून त्यांचं एक एक गाणं ऐकायचे. अमुक एक तान किंवा हरकत 50-50 वेळा ऐकायचे. त्यामुळे माझ्या सारखे अनेक शिष्य त्यांनी घडवले असं म्हणायला काही हरकत नाही.

त्यांचं गाणं म्हणजे गळ्याची कसरत. वडील दीनानाथ मंगेशकर यांची नाट्यपदे जेव्हा त्या त्यांच्या पद्धतीने सादर करतात तेव्हा त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या प्रावीण्याची प्रचिती येते. “आम्ही ठाकर ठाकर ” या गाण्यावर तुमची पावलं थिरकली होती, तो video फार viral झाला. आशाताई म्हणजे उत्साह, energy, स्वरांची जादूगिरी. लहानांपासून ते हल्लीच्या तरुणाईला सुद्धा त्यांच्या गाण्यांनी वेड लावलंय.

त्यांची अनेक गाणी मला संगीताची अभ्यासक म्हणून खूप आवडतात. ती म्हणजे,  मलमली तारुण्य माझे, ऋतू हिरवा, फुलले रे क्षण माझे, श्रावणाचं ऊन मला झेपेना, नभ उतरू आलं, जाईये आप कहा जायेंगे, हंगामा हो गया, मुझे रंग दे, दयार ए दिल की रात मे, दिल धडकने का सबब, मेरा कुछ सामान, कभी तो नजर मिलाओ, पिया तू, ओ मेरी जान मैने कहा अशी हजारो गाणी अतिशय श्रवणीय आहेत आणि त्या प्रत्येक गाण्याला ” special   आशा ताई touch “आहे.

आज आशाताईंचा वाढदिवस आहे. या मंगलदिनी मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मंगल कामना करते.

We love you Aashatai !!!


———कोमल धांडे———

लेखिका गायिका /अभिनेत्री आहेत.


आपल्या प्रतिक्रिया प्रतिसाद रकान्यात जरूर द्या.

MediaBharatNews

comments
  • Nageshwara Suresh Nagnathkar

    September 8, 2019 at 6:15 pm

    आशा भोसले जी दुसऱ्या सरस्धती आई माता जननी आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो…

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!