मंदिरात मांस फेकणारा हरी रामप्रकाश पोलिसांच्या ताब्यात !

मंदिरात मांस फेकणारा हरी रामप्रकाश पोलिसांच्या ताब्यात !

मंदिरात मांस फेकणारा हरी रामप्रकाश पोलिसांच्या ताब्यात !

तामीळनाडूतील कोइंबतूर येथील सुलीवन मार्गावरील वेणूगोपाल कृष्णास्वामी आणि श्री राघवेंद्र मंदिराच्या आवारात मांस फेकल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे कोइंबतूर शहरात तणाव होता. या

घटनेचा संशय अर्थातच मुस्लिमांवर होता. पण आरोपी पकडला गेलाय. त्याचं नाव एस हरी रामप्रकाश! तो सिवील इंजिनिअर आहे. पण आता तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं सांगितलं जात आहे.

४८ वर्षीय रामप्रकाश कुंडापलायम भागात राहणारा आहे. मंदिरात मांस फेकल्यावर तो मोटारसायकलवर निघून गेला, हे सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं. गाडीच्या क्रमांकावरून आरोपीची माहिती मिळवण्यात आली व त्याला हुडकून काढण्यात आलं.

आरोपी कुठल्याही धार्मिक संघटनेशी संबंधित नसल्याचं पोलिसांना प्राथमिक तपासात दिसून आलंय.

Need by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!