काँगोमध्ये कोरोनाच्या जोडीला इबोला !

काँगोमध्ये कोरोनाच्या जोडीला इबोला !

काँगोमध्ये कोरोनाच्या जोडीला इबोला !

करोना महामारीशी जग लढत असतान इबोलाच्या प्रादुर्भावालाही काँगो मधून सुरुवात झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ह्या बातमीला पुष्टी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार काँगो मध्ये ६ इबोलाचे नवे रुग्ण आढळून आले होते पैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

काँगो आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, काँगोमधील पश्चिम क्षेत्रातील मबंडाकामध्ये इबोलाचे ६ नविन मामले समोर आले आहेत.२०१८ नंतर दुस-यांदा इबोलाने काँगो मध्ये पाय पसरायला सुरुवात केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे की,

“काँगो मध्ये इबोलाचे रुग्ण असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे.सुदैवाने ज्या भागात इबोलाचे रुग्ण सापडत आहेत तिथे करोनाचा एकही रुग्ण नाही पण संपूर्ण काँगो मध्ये आतापर्यंत ३००० रुग्णांची नोंद झालेली आहे.”

जग करोना महामारीशी लढत असताना दुसरा एक गंभीर विषाणू आपले डोक वर काढत आहेत. वेळीच ह्यावर ठोस पाऊले उचलले नाहीत तर जगभर आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

News by MediaBharatNews Team

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!