येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता !

येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता !

येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता !

येत्या २४ तासांत कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. किनारपट्टी आणि कर्नाटकाच्या उत्तर भागात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथल्या काही ठिकाणी मुसळधार पाऊसासह तसेच किनापरट्टी लगत समुद्र लाटांसह निसर्ग चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर राज्यसरकार तयारीला लागले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली, निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारनं केलेल्या तयारीचा घेतला आढावा घेतल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या तुकड्याही सज्ज करण्यात आल्या आहेत. एनटीआरफच्या १६० तुकड्यांपैकी १० तुकड्या किनारी भागात तैनात करण्यात आलेल्या आहेत.

किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना दिलेल्या आहेत.

विजपुरवठा खंडीत होणार नाही ह्याची काळजी घेण्यासह आरोग्यविषयक संपूर्ण काळजी घेण्यात येईल असही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल आहे.

मुंबईतील सखल भागातील नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे तसेच गरज भासल्यास अधिक रुग्णालय उपलब्ध करुन देणे तसेच जनरेटर्सची सुविधा करण्याबाबत मुंबई क्षेत्रातील महानगरपालिका आदेश देण्यात आले आहेत.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!