संकटात संधी ; मुंबई महापालिकेची बाॅडी बॅगची चढ्या दराने खरेदी !

संकटात संधी ; मुंबई महापालिकेची बाॅडी बॅगची चढ्या दराने खरेदी !

संकटात संधी ; मुंबई महापालिकेची बाॅडी बॅगची चढ्या दराने खरेदी !

देशभरात कोरोना संक्रमणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मुंबई त्याचा केंद्रबिंदू बनलाय. एकीकडे, कोरोना प्रतिबंधाकरीता मुंबई महानगरपालिका युद्धपातळीवर कार्यरत आहे, तर दुसरीकडे कोरोनात मृत्यू पावलेल्या मृतदेहांना बांधण्यासाठी वापरात येणाऱ्या प्लास्टिक बाॅडीबॅगच्या चढ्या दराने केलेल्या खरेदीमुळे वादात सापडली आहे.

कोरोना बाधितांच्या उपचारासाठी मुंबई महानगरपालिकेने पीपीई किट्स, मास्क, ग्लोवज ,इतर साहित्यासह मृत शरीर गुंडाळण्यासाठी प्लास्टिक बाँडी बँग्ज या निविदा प्रकियेतुन वेदांत इन्नोटेक प्रा. लि. नामक कंपनीकडून खरेदी केल्या. परंतु, मृत झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या अंत्यविधी दरम्यान जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून वापरात येणाऱ्या या प्लास्टिक बॉडी बॅगची खरेदी भरमसाठ दराने केल्याचा आक्षेप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.

यावर मुंबई मनपा आयुक्त आई एस चहल यांनी उत्तर देत, निविदा प्रक्रियेत सहभागी इतर कंपन्या अपेक्षित साहित्य यादी पुरविण्यात सक्षम नसल्याने हे कंत्राट वेदांत इन्नोटेक प्रा. लि. ला देण्यात आले होते. नंतर याच गुणवत्तेच्या बँग्ज दिल्ली, जयपूर मध्ये २५०० ते ३००० दरम्यान कमी किमतीत उपलब्ध होत असल्याचे अढळले. त्यामुळे, संबधीत ठेका रद्द करून दुबार निविदा मागविल्या आहेत.

अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, वेदांत ईन्नोटेक प्रा. लि. कंपनी कडून महापालिकेने प्रति बँग ६७१९ रुपयांंना खरेदी केली. मूळात कंपनीला वैद्यकीय उपकरण व बॉडी बॅग्ज विक्रीचा अनुभव नसतानांंही इतके मोठे टेंडर या कंपनीला कसे दिले गेले. ज्या बॅग्स बाजारात ६०० ते १२०० रुपयांत मिळायला हव्या. गेल्या अमेरिकेत देखील अशा अधिक गुणवत्ता धारक बॅग्ज ५१ डॉलर्स म्हणजे ३९०० रुपयांपर्यंत मिळू शकतात. त्या इतक्या चढ्या व दुप्पट भावाने मुंबई महानगरपालिके ने किमतीत खरेदी केली. ही अत्यंत घृणास्पद बाब असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून कंपनीकडून परताव्याची मागणीही अंजली दमानिया यांनी केली आहे.

News by Praful Kedare

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!