जेईई मेन – २०२१ परीक्षा पुढे ढकलली !

जेईई मेन – २०२१ परीक्षा पुढे ढकलली !

जेईई मेन – २०२१ परीक्षा पुढे ढकलली !

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA ने JEE ( main ) परीक्षेचं एप्रिल सत्र पुढे ढकललंय. नवी तारीख १५ दिवस आधी जाहिर केली जाईल, असं एजन्सीने म्हटलंय. जेईई

परीक्षेचं पहिलं सत्र २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान पार पडलं होतं, तर दुसरं सत्र १६ ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आलं.

या दोन सत्रांमध्ये अनुक्रमे ६ लाख २० हजार ९७८ व ५ लाख ५६ हजार २४८ परीक्षार्थींनी सहभाग नोंदवला होता. एप्रिल सत्र २७, २८ व २९ एप्रिल रोजी नियोजित होतं. परंतु, देशावरील कोविड संकट लक्षात घेता एजन्सीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यानच्या काळात अधिक चांगल्या तयारीसाठी एजन्सीने NTA Abhyas App चा वापर सुचवला आहे.

पुढील माहितीसाठी http://www.nta.ac.in किंवा

https://jeemain.nta.ac.in या वेबसाईटवर उमेदवारांनी भेट द्यावी. तसंच शंका निरसनासाठी 01140759000 या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा jeemain@nta.ac.in वर ई-मेल करावा, असंं आवाहन एजन्सीने केलंं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!