चोवीस पिण्याचं शुद्ध पाणी देणारं भारतातलं शहर तुम्हाला माहितीये ?

चोवीस पिण्याचं शुद्ध पाणी देणारं भारतातलं शहर तुम्हाला माहितीये ?

चोवीस पिण्याचं शुद्ध पाणी देणारं भारतातलं शहर तुम्हाला माहितीये ?

ओडिशा सरकारने लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी या उपाययोजनांवर करोडोंची अर्थसंकल्पीय तरतूद ठेवली आहे व ती दरवर्षी वाढत आहे. पिण्याचं 24 तास शुद्ध पाणी देणारं पुरी हे शहर आता लंडन न्यूयॉर्क या सारख्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या रांगेत जाऊन बसलं आहे.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ओळख आता ‘काम कमी आणि बोभाटा जास्त’ अशी झाली आहे. जिथे तिथे स्वतःचे फोटो लावण्यावर मोदींचा भर असतो. अगदी एखाद्या कार्यक्रमात कॅमेरामन आणि त्यांच्यामध्ये कोणी आलं तर ते चिडल्याचं अनेकदा पाहिलं गेलं आहे ;

परंतु भारतात काही राजकीय नेते असेही आहेत, जे माध्यमात कमी चर्चेत असतात. त्यांचे फोटो कमी पाहायला मिळतात आणि जाहिरातबाजीतही ते फारसे अडकलेले दिसत नाहीत. परंतु शांतपणे आपलं काम मात्र करत असतात. असंच एक नाव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक !

ते सध्या चर्चेत आले आहेत ते एका सकारात्मक बातमीमुळे. ओडिशा राज्यातील पुरी हे शहर 24 तास पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध असलेलं देशातलं पहिलं शहर ठरलं आहे.

नळावाटे शुद्ध पाणी या सुजल योजनेतून नवीन पटनायक यांनी ते साध्य करून दाखवलं आहे. पुरी शहरातील अडीच लाख नागरिकांना आता पिण्याचे पाणी शुद्ध मिळावं यासाठी कोणत्याही घरगुती किंवा यांत्रिक शुद्धीकरण प्रक्रियेवर अवलंबून रहावं लागणार नाही किंवा त्यांना पाण्याची साठवणूकही करावी लागणार नाही.

नळावाटे येणारं पाणी थेट पिण्यायोग्य तसंच ते स्वयंपाकासाठी वापरण्या योग्य असेल. नागरिकांना सोबतच त्याचा फायदा पुरीत दरवर्षी येणाऱ्या दोन कोटी पर्यटकांनाही होणार आहे. त्यांना आपल्या सोबत पाण्याच्या बाटल्या बाळगण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे प्लास्टिक वापराचा प्रश्नही आपोआपच निकाली निघणार आहे.

ओडिशा सरकारने लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी या उपाययोजनांवर करोडोंची अर्थसंकल्पीय तरतूद ठेवली आहे व ती दरवर्षी वाढत आहे. पिण्याचं 24 तास शुद्ध पाणी देणारं पुरी हे शहर आता लंडन न्यूयॉर्क या सारख्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या रांगेत जाऊन बसलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account

Log In Your Account

Don`t copy text!