लस भारतीय ; पण टोचायला सूई मात्र चीनी !

लस भारतीय ; पण टोचायला सूई मात्र चीनी !

लस भारतीय ; पण टोचायला सूई मात्र चीनी !

चायनाने भारतीय सैनिकांच्या हत्या करो की भारतीय भूप्रदेशात घुसखोरी करो, चीनी एप्सवर बंदी घालून भारतीयांना खूश करणारं केंद्र सरकार व्यापारधंद्याच्या बाबतीत मात्र आजही चायनावर मेहेरबान आहे. सिरमच्या माध्यमातून भारताने स्वतःची लस बनवली खरी, पण सरकारच्या चीनीप्रेमामुळे ती टोचून घ्यावी लागणारेय, चीनी सूईतून !

भारतीय सिरिंज निर्माता संघटनेने चीनी सूईवर आयात कर वाढवण्याची सूचना केलेली आहे खरी, पण तूर्त तरी लसीकरणाची सुरुवात चीनी सूयांतूनच होणार आहे.

भारतात कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात जानेवारीपासून होतेय. त्याची पूर्वतयारी म्हणून केंद्राने राज्यांमध्ये सिरिंज पाठवायला सुरुवात केलीय. गुजरातमधील सौराष्ट्रात ज्या सिरिंज पोहचल्यायंत त्या भारत सरकारने खास लसीकरण मोहिमेसाठी चीनी कंपनीकडून बनवून घेतल्यात. वेष्टणावर चीनी कंपनीचं नाव व पत्ताही आहे. विक्रीसाठी नाही, असंही नमूद केलेलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने २६ नोव्हेंबर, २०२० रोजी दिलेल्या वृत्तानुसार, सिरिंज एन्ड नीडर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून चीनी सूईवरील आयातकर दुप्पट करण्याची विनंती केली होती.

भारतीय सिरिंज उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी दर महिन्याला ३५ कोटी सूई उत्पादनाची त्यांची क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करणारं उत्पादन भारतीय कंपन्यांचं आहे.

गेल्या वर्षी १०७ कोटी सूयांची निर्यात भारतीय कंपन्यांनी केली होती. पण स्वतःच्याच देशात अगदी स्वस्त येणाऱ्या चीनी सूयांची स्पर्धा त्यांना करता येत नाहीये. चीनी सूई दोन रुपयांपेक्षाही कमी किंमतीत सरकारला प्राप्त होते. त्याचं एक प्रमुख कारण की तिथलं सरकार निर्यातीत खूप सारी सवलत देते.

गेली बारा वर्षं भारतातील सार्वत्रिक लसीकरणासाठी वुक्सी युशोयू मेडिकल अप्लायसेन्स सूयांचा पुरवठा करतेय. ४४० दशलक्ष युनिटची मागणी कंपनीच्या हातात आहे. भारताची ५० ते ६० टक्के गरज ही कंपनी पूर्ण करतेय. कंपनीचा करोडोंचा साठा भारतात आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी त्याचा वापर सुरू झालाय.

देशभरात विविध राज्यांत ज्या सूया पोहचतायेत, त्या चीनी कंपनीच्याच आहेत. परंतु नव्याने जी गरज लागणार आहे, तिची पूर्तता भारत चीनी कंपनीकडूनच करणार की भारतीय उत्पादकांना संधी देणार याकडे इथल्या कंपन्यांचं लक्ष लागून आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!