मराठी भाषिकेतरांसाठी उल्हासनगर महानगरपालिकेची मराठी गीत गायन स्पर्धा !

मराठी भाषिकेतरांसाठी उल्हासनगर महानगरपालिकेची  मराठी गीत गायन स्पर्धा !

मराठी भाषिकेतरांसाठी उल्हासनगर महानगरपालिकेची मराठी गीत गायन स्पर्धा !

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने घोषित केलेल्या मराठी भाषा संवर्धन स्पर्धेत उल्हासनगर महानगरपालिका सहभागी झालेली असून त्या अंतर्गत मराठी भाषिकेतर नागरिकांसाठी मराठी गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातील हा एक उल्लेखनीय उपक्रम आहे.

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या व ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशा नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यासाठी कराओके ट्रॅक वर गायलेले मराठी गाणे रमेश आव्हाड (+917798976199) किंवा दीक्षा मोरे (+919623735061) यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर गुरुवार ८ डिसेंबर २०२२रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पाठवायचे आहे.

गाणे गाण्यापूर्वी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक सांगणे आवश्यक आहे. त्यानंतर गाण्याचे एक कडवे सादर करावे व ते रेकॉर्डिंग नमूद क्रमांकावर पाठवावे. ही स्पर्धेची चाचणी फेरी असेल त्यातून निवड झालेल्या स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती स्पर्धा समन्वयक योगेश मराठे (8097141395) व भास्कर शिंदे (9822703966) यांनी दिली आहे.

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!