आंबेडकरी ग्रंथवाचन हेच यंदाचं अभिवादन ! !

आंबेडकरी ग्रंथवाचन हेच यंदाचं अभिवादन ! !

आंबेडकरी ग्रंथवाचन हेच यंदाचं अभिवादन ! !

चैत्यभूमी म्हणजे कुठलं देवस्थान नाही की दर्शन घेतलंच पाहिजे त्या शिवाय नवस फिटत नाही !

हे दर्शन घेण्याचं ठिकाण नाही, आपण तिथे अभिवादन करायला जातो. अभिवादन कुठंही करता येतं. त्या साठी चैत्यभूमीवरच गेलं पाहिजे असं नाही. ही एक अपवादात्मक परिस्थिती आहे.

ज्याला त्याच देवस्थान करायचं असेल तो आवर्जून दर्शन घ्यायला जाईल. ज्याला स्फूर्ती घ्यायची असेल, तो अशा वेळेला घरात बसून एखादं बाबासाहेबांचं पुस्तक वाचत बसेल. विशेषतः 10 वा भाग ! ज्या मध्ये राष्ट्रनिर्मिती साठी बाबासाहेबांनी काय काय केलं यांची थोडी माहिती मिळेल…!

विशेषतः पाणी संवर्धन, आर्थिक विकास, कामगार कल्याण, इत्यादी विषयावर केलेल्या कामगिरीची माहिती मिळेल. १९४२ ते १९४६ पर्यंत मजूर मंत्री असतांना या देशाचा आर्थिक विकासाचा पाया रचला, याचं ज्ञान मिळेल.

राजेंद्र गवई यांनी मुंबईतल्या लोकांना तरी चैत्यभूमी वर परवानगी मिळावी असं म्हटलंय.जनतेला भडकवण्याचा हा प्रकार आहे, त्यांना कळलं पाहिजे, हे देवस्थान नाही ;

त्यामुळे अशा कोरोनासारख्या कठीण प्रसंगी तिथं गेलंच पाहिजे असं नाहीये. हे ज्या नेत्यांना कळत नाही, याचा अर्थ त्यांना चैत्यभूमीचं देवस्थान करून लोकांना कर्मकांडात अडकवायचं आहे, ज्या कर्मकांडातून अथक परिश्रमाने आम्हाला बाबासाहेबांनी बाहेर काढलं आहे.

मला वाटतं घरात बसून व्हाॅल्यूम १० वाचून आपण डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करू…! तेच बाबासाहेबांना अभिप्रेत होतं आणि तेच खरं अभिवादन ! त्यातूनच स्फूर्ती मिळेल !!

 

 

सुनील कदम

सामाजिक-राजकीय अभ्यासक


 

 

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!